JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / रानू यांना प्रसिद्धी पेक्षाही मिळालं मोठं गिफ्ट, 10 वर्षानंतर परतली मुलगी

रानू यांना प्रसिद्धी पेक्षाही मिळालं मोठं गिफ्ट, 10 वर्षानंतर परतली मुलगी

सध्या जिथे पाहावं तिथे आज रानूच्या आवाजाची चर्चा आहे. हिमेश रेशमियानं तिला आपल्या सिनेमासाठी गाण्याची ऑफर दिली आणि तिचं आयुष्य बदललं मात्र त्याआधी एक व्यक्ती रानूच्या आयुष्यात देवदूत बनून आली आणि ती अचानक प्रसिद्धीच्या झोतात आली.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 ऑगस्ट : पश्चिम बंगालच्या रानाघाट स्टेशनवर गाणं गाऊन स्वतःचं पोट भरणाऱ्या रानू मंडल सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. कधी रेल्वे स्टेशनवर गाणं गात भीक मागणाऱ्या रानू आज बॉलिवूडसाठी गाणं गातात. रानूच्या आवाजानं आज अनेकांना भूरळ घातली आहे. त्यांच्या सुरेल आवाजामुळे त्यांच्या आयुष्यालाही एक वेगळं वळण मिळालं आहे. त्यांना मिळालेल्या प्रसिद्धीनंतर आता त्यांची मुलगी 10 वर्षांनंतर सापडली आहे. आईला पडद्यावर पाहिल्यानंतर रानू यांच्या मुलीने त्यांचा शोध घेतला. तब्बल 10 वर्षानंतर या दोघांची भेट झाली आहे. इतक्या वर्षांनी आपल्या मुलीला भेटल्यामुळे रानू यांनी यावर आनंद व्यक्त केला आहे. आता माझ्या दुसऱ्या आयुष्याला सुरुवात झाली असल्याचं रानू यांनं म्हटलं आहे. सध्या जिथे पाहावं तिथे आज रानूच्या आवाजाची चर्चा आहे. हिमेश रेशमियानं तिला आपल्या सिनेमासाठी गाण्याची ऑफर दिली आणि तिचं आयुष्य बदललं मात्र त्याआधी एक व्यक्ती रानूच्या आयुष्यात देवदूत बनून आली आणि ती अचानक प्रसिद्धीच्या झोतात आली. त्या व्यक्तीनं तिचा पहिला व्हिडीओ शूट केला. जो तिच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. रानू पश्चिम बंगालच्या रानाघाट स्टेशनव गाणं गाऊन स्वतःचं पोट भरत असे. अनेक लोकांनी तिचं गाणं ऐकलं काहीनी तिचं कौतुक केलं तर काहींनी तिला पाहून तिच्याकडे दुर्लक्ष केलं. रानू नेहमी जुनी गाणी गात असे. तिचा पहिला व्हिडीओ व्हायरल झाला त्यात ती लता मंगेशकर यांचं ‘एक प्यार का नगमा’ हे गाणं गात होती. पण तिचं हे गाणं व्हायरल होण्यामागे हात होता तो एतींद्र चक्रवर्ती नावाच्या एका तरुणाचा. जेव्हा रानू गाणं गात होती, त्यावेळी एतींद्र त्या ठिकाणी होता. त्यानं सहज म्हणून तिचा व्हिडीओ बनवला आणि आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला. जो पुढे खूप व्हायरल झाला आणि फेमसही.

इतर बातम्या - बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी दिला ‘हा’ शब्द एतींद्रने रानू यांचा व्हिडीओ त्याच्या फेसबुक अकाउंटवर शेअर केला आणि रानूचं आयुष्य बदलत गेलं. त्यानंतर आता हिमेश रेशमियानं रानूला त्याच्या सिनेमासाठी गाण्याची ऑफर दिली. रानूच्या गाण्याचं रेकॉर्डिंग सुरू असताना एतींद्र सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होता. त्यानं कधी कल्पनाही केली नसेल की त्याचा एक व्हिडीओ एका महिलेचं आयुष्य अशाप्रकारे बदवून टाकेल. रानूला ही संधी दिल्याबद्दल एतींद्रने हिमेशचे आभार मानले. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एतींद्र सतत रानूच्या संपर्कात आहे. तो व्यावसायानं सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे आणि रानाघाटमध्येच राहतो. इतर बातम्या - इंग्लंडच्या खेळाडूंना चडली विजयाची नशा, भर मैदानातच झाली बिअर पार्टी! हिमेश रेशमियाचा आगामी सिनेमा हॅप्पी हार्डी अँड हीर आहे. ज्यात रानू मंडलने ‘तेरी मेरी कहानी’ हे गाणं गायलं आहे. याचा व्हिडीओ हिमेशनं त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. ज्यात रानू स्टुडिओमध्ये हिमेशसोबत गाण्याचं रेकॉर्डिंग करताना दिसत आहे. तर हिमेश तिच्या बाजूला उभा राहून तिला गाइड करत आहे. VIDEO : नाना पटोलेंनी काढले मुख्यमंत्री कार्यालयाचे वाभाडे, भाजपच्या गोटात खळबळ

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या