परिणीती चोप्रा बनणार राजकीय घराण्याची सून
मुंबई, 9 मे : Parineeti Chopra and Raghav Chadha engagement: आम आदमी पक्षाचा (आप) नेता राघव चड्ढा आणि बॉलिवूडची अभिनेत्री परिणीती चोप्रा यांच्या लग्नाचे वृत्त गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी परिणीती आणि राघव सार्वजनिक ठिकाणी दिसले होते, त्यावेळी परिणीतीच्या हातात अंगठी दिसल्याने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. तिने आधीच साखरपुडा केल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र हे वृत्त खरं नाही, कारण आता त्याच्या साखरपुड्याची तारीख समोर आली आहे, दोघेही 13 मे रोजी (शनिवारी) साखरपुडा करणार आहेत. अवघे 150 मित्र होणार सहभागी मीडियासमोर आलेल्या माहितीनुसार, राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांचा साखरपुडाचा सोहळा दिल्लीत आयोजित करण्यात येणार आहे. या साखरपुड्याच्या सोहळ्यात दोघांचे 150 मित्र-मैत्रिणी, नातेवाईक सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. साखरपुडा जरी दिल्ली आयोजित करण्यात आला असला तरी लग्नसोहळा मुंबईत ठेवला जाऊ शकतो. मात्र अद्याप याबाबत नेमकी माहिती सांगू शकत नाही. Arijit Singh: लाईव्ह कॉन्सर्टमध्ये महिलेने अरिजित सिंगसोबत केलं धक्कादायक कृत्य; गायक जखमी कधी आहे लग्न? गेल्या काही दिवसांपासून आलेल्या बातम्यांनुसार, परिणीती आणि राघव या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्याच लग्नबंधनात अडकणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र अद्याप दोघांपैकी कोणीच आपल्या नात्यावर अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र अनेक सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल, लंच डेटवर दोघे एकत्र दिसल्याने चर्चा होती. दोघांचं एकत्र झालंय शिक्षण दोघे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. राघव चड्डा आणि परिणीती चोप्रा यांनी एकत्र लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेतलं होतं. कामाबाबत सांगायचं झालं तर परिणीमी इम्तियाज अली दिग्दर्शित चमकीला या चित्रपटात दिलजीत दोसांझसोबत दिसणार आहे. हा चित्रपट पंजाबी गायक अमर सिंग चमकिला यांच्या कथेतून प्रेरित आहे.