JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / 1 एप्रिलपासून भारतीयांना मिळणार नाही ही ऑनलाइन सर्व्हिस, वाचा कोणत्या कामाचा होऊ शकतो खोळंबा

1 एप्रिलपासून भारतीयांना मिळणार नाही ही ऑनलाइन सर्व्हिस, वाचा कोणत्या कामाचा होऊ शकतो खोळंबा

केवळ ग्लोबल कस्टमर या सेवेचा उपयोग करून भारतीय व्यापाऱ्यांना पेमेंट करण्यास सक्षम असतील.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 6 फेब्रुवारी : अमेरिकी ऑनलाईन कंपनी PayPal Holdings Inc ने भारतात डोमॅस्टिक पेमेंट सर्व्हिस 1 एप्रिलपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. केवळ ग्लोबल कस्टमर या सेवेचा उपयोग करून भारतीय व्यापाऱ्यांना पेमेंट करण्यास सक्षम असतील. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, 1 एप्रिल 2021 पासून संपूर्ण लक्ष भारतीय व्यवसायासाठी अधिक आंतरराष्ट्रीय विक्री सक्षम करण्यावर केंद्रीत करणार आहे आणि भारतातील घरगुती डॉमेस्टिक प्रोडक्टपासून दूर राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे 1 एप्रिलपासून भारतात देशांतर्गत पेमेंट सर्व्हिस देणार नसल्याचं PayPal Holdings Inc ने सांगितलं आहे.

(वाचा -  आता BookMyShow वर चित्रपटही पाहता येणार; कंपनीची नवी स्ट्रीम सर्व्हिस सुरू )

सध्या PayPal भारतीय ऑनलाईन app वर वापरात आहे. मेक माय ट्रीप, बुकमायशो आणि स्विगीवर पेमेंट ऑप्शन म्हणून PayPal उपलब्ध आहे. दरम्यान, भारतात गुगल पे, पेटीएम, फोनपेनंतर आता टेलिकॉम कंपनी एअरटेलही ऑनलाईन पेमेंट सर्व्हिसमध्ये उतरली आहे. भारतात डिजिटल पेमेंट आणि डिजिटल ट्रान्झेक्शनचा वाढता ट्रेंड पाहता टेलिकॉम कंपनी एअरटेलनेही (Airtel) ऑनलाईन पेमेंटमध्ये पाऊल ठेवलं आहे. एअरटेलने ‘Airtel Safe Pay’ नावाने एक सर्व्हिस सुरू केली आहे. ही सर्व्हिस एअरटेलच्या ऑनलाईन बँकिंग सिस्टम, एअरटेल पेमेंट बँक (Airtel Payments Bank) अंतर्गत सुरू करण्यात आली आहे. याद्वारे युजर्स सुरक्षित आणि सहज ऑनलाईन ट्रान्झेक्शन करू शकतील असा दावा कंपनीने केला आहे.

(वाचा -  Airtel ने सुरू केली पेमेंट सर्व्हिस; ट्रान्झेक्शन सुरक्षित होणार, कंपनीचा दावा )

दुसरीकडे बजाज फायनान्सनेही (Bajaj Finance) या आर्थिक वर्षाच्या अखेरीस, अर्थात मार्च 2021 पर्यंत डिजिटल पेमेंट अ‍ॅप बजाज पे (Bajaj Pay) लाँच करण्याची घोषणा केली आहे. हे अ‍ॅप युजर्सला यूपीआय, पीपीआय, ईएमआय कार्ड आणि क्रेडिट कार्डशी संबंधीत पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या