JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / Mumbai News: भावासोबत झालेल्या क्षुल्लक वादामुळे 16 वर्षीय मुलीचं टोकाचं पाऊल, उंदीर मारण्याचं औषध पिऊन संपवलं जीवन

Mumbai News: भावासोबत झालेल्या क्षुल्लक वादामुळे 16 वर्षीय मुलीचं टोकाचं पाऊल, उंदीर मारण्याचं औषध पिऊन संपवलं जीवन

मुंबईत एका 16 वर्षीय मुलीनं (16 years old girl ) भावासोबत (Quarrel with brother) झालेल्या क्षुल्लक वादानंतर धक्कादायक पाऊल उचललं आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 सप्टेंबर: मुंबईत एका 16 वर्षीय मुलीनं (16 years old girl ) भावासोबत (Quarrel with brother) झालेल्या क्षुल्लक वादानंतर धक्कादायक पाऊल उचललं आहे. तिनं थेट आपलं जीवन संपवलं आहे. कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. 16 वर्षीय मुलीचा आपल्या भावासोबत मोबाईल गेम खेळण्यावरुन वाद झाला. त्यानंतर तिनं त्या रागात उंदीर मारण्याचं (Rat Poison)औषध पिऊन आत्महत्या (Suicide) केली. शुक्रवारी रात्री मृत मुलगी आणि तिच्या भावामध्ये मोबाईलवर गेम खेळण्यावरुन वाद झाला. त्यांच्याकडे एकच मोबाईल होता. भावानं मोबाईल न दिल्याचा राग मुलीला अनावर झाला. त्यानंतर तिनं रागात उंदीर मारण्याचं औषध प्यायलं. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी तिला तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र दुसऱ्या दिवशी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

संबंधित बातम्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास मुलीचा मृत्यू झाला. शवविच्छेदन झाल्यानंतर मुलीचा मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात आला. हेही वाचा-  ‘‘ते अनधिकृत कार्यालय तोडा’’, अनिल परब यांच्या अडचणीत वाढ ही घटना शुक्रवारी रात्री 11.30 च्या सुमारास घडली असून मृत मुलीचा तिच्या लहान भावासोबत मोबाईलवर गेम खेळण्यावरुन वाद झाला. या रागात मुलीनं जवळच असलेल्या मेडिकल स्टोअरमधून उंदीर मारण्याचं औषध आणलं. रागीट स्वभावाच्या असलेल्या या मुलीनं ते औषध आपल्या लहान भावासमोरचं प्यायली. तिनं औषध पिताच भावानं आपल्या आईवडिलांना ही गोष्ट सांगितलं. त्यानंतर मुलीच्या आईवडिलांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती समता नगरचे पोलीस उपनिरीक्षक संतोष खराडे यांनी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या