JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / मुलगी झाली म्हणून सासरच्यांकडून छळ.. विवाहितेने केली आत्महत्या

मुलगी झाली म्हणून सासरच्यांकडून छळ.. विवाहितेने केली आत्महत्या

सासरच्या जाचाला कंटाळून 20 वर्षीय विवाहितेने केली गळफास घेऊन आत्महत्या…

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भुसावळ,20 ऑक्टोबर: सासरच्या जाचाला कंटाळून 20 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. बोडवड शहरातील मलकापूर रोडवर ही घटना घडली आहे. संगीता आश्विन बोदडे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी बोदवड पोलिस ठाण्यात पती, सासू, सासरा, नणंद अशा सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी तिघांना अटक करण्यात आली आहे. मिळालेली माहिती अशी की, मलकापूर रोडवरील राहणारे संजय श्रावण बोदडे हे मुलगा अश्विन, पत्नी शैला व सून संगीता सोबत राहतात. शुक्रवारी (18 ऑक्टोबर) संगीता आश्विन बोदडे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत संजय बोदडे यांनी फोनवरून संगीताच्या माहेरच्यांना माहिती दिली. शनिवारी भाऊ, बहीण, आई व मावसा हे पहाटे 4 वाजता इंदूर येथून बोदवडला पोहोचले. रुग्णालयात संगीताच्या मृतदेहाची पाहणी केली. गळ्यावर गळफासाचे खूणा, ओरखडे आढळले. दरम्यान, दोनच दिवसापूर्वी मावसा संगीताला भेटून गेले होते. त्यावेळी तिने सासरच्या लोकांकडून खूपच जाच असल्याचे सांगितले. मुलगी झाली म्हणून छळ मुलगी झाल्याने सासू शैलाबाई, नणंद शीतल व रक्षा हे संगीता हिला टोचून बोलत होते. दोन महिन्यांपासून पती आश्विन बोदडे, सासरा संजय बोदडे माहेरुन पैसे आणावेत यासाठी त्रास देत असल्याचे सांगितले. मृत विवाहितेचा भाऊ नंदू ओंकार अंभोरे (रा.इंदूर) यांच्या फिर्यादीवरून पती आश्विन संजय बोदडे, सासरा संजय श्रावण बोदडे, सासू शैला संजय बोदडे यांना अटक करण्यात आली. तर नणंद शीतल, रक्षा, चुलत सासू राणी मोहन बोदडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या सर्व प्रकरणात मात्र तीन महिन्याच्या चिमुकलीचे आईचे छत्र हरवले आहे. VIDEO:परळीपासून ते वरळी ‘या’ आहे राज्यातील बिग फाईट्स, कोण मारणार बाजी?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या