मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या करणार विठ्ठलाची महापूजा, पण वर्षा बंगल्यावर

मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी पंढरपूरमध्ये विठ्ठलाची शासकीय महापूजा करणार नाहीत. मात्र मुंबईतल्या वर्षा बंगल्यावर ते सपत्निक विठ्ठलाची महापूजा करणार आहेत.

मुंबई,ता. 22 जुलै: मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी पंढरपूरमध्ये विठ्ठलाची शासकीय महापूजा करणार नाहीत. मात्र मुंबईतल्या वर्षा बंगल्यावर ते सपत्निक विठ्ठलाची महापूजा करणार आहेत. ज्यावेळी पंढरपूरमध्ये महापुजेला सुरवात होईल त्याच वेळी वर्षामधल्या महापुजेला सुरूवात होणार आहे. पंढपूरला जाता आलं नाही तरी पूजेचा नेम चुकवणार नाही. मी माझ्या निवास्थानीच महापूजा करणार असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं.आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या मराठी क्रांती मोर्चाने मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात येण्यासाठी बंदी घातली आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या भावना लक्षात घेत मी पंढरपुरात जाणार नसल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मला खूप मोठी सुरक्षा आहे. मला कोणी हात नाही लावू शकत पण वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी मी पंढरपूरात जाणार नाही.

महाराष्ट्रात स्वबळावर लढण्याची भाजपची तयारी : अमित शहांचा कार्यकर्त्यांना आदेश

महाराष्ट्रासाठी अमित शहांचा 'अॅक्शन प्लान', या आहेत 16 महत्वाच्या गोष्टी

BLOG : आषाढी वारी म्हणजे जन्माची शिदोरी!

PHOTO - या नेत्यांना करता आली नाही विठ्ठलाची महापूजा

दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाने वारकऱ्यांना आंदोलनाचा त्रास होऊ नये म्हणून पंढरपूरमधलं आंदोलन स्थगित केलं आहे. सोमवारी मराठा क्रांती मोर्चाचं पंढरपुरातलं आंदोलन होणार नाही. मात्र इतर ठिकाणी सुरू असलेले आंदोलन अधिक तीव्र करू असा इशारा औरंगाबाद संयोजक समितीनं दिला आहे.  

Trending Now