मुंबई, 14 ऑक्टोबर : विधानसभा निवडणूक एका आठवड्यावर आल्यामुळे सर्व पक्षातील नेत्यांनी सभांचा धडाका लावला आहे. आजही अनेक नेत्यांचा सभा होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आज मराठवाडा आणि विदर्भात सभा होणार आहे. मुख्यमंत्री विदर्भ भोकर, पुसद, आर्णी मतदार संघात प्रचार सभा घेणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री पोहरादेवीचं दर्शन घेणार आहेत. संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांचा मुंबई उपनगरात आज रोड शो होणार आहे. त्यानंतर राजनाथसिंह सभा घेणार आहे. उद्धव ठाकरेंच्याही आज दोन सभा होणार आहे. मराठवाड्यातील उस्मानाबादेत उद्धव ठाकरेंची प्रचार सभा आज होणार आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे सोलापूरात सभा घेणार आहे. राज ठाकरेही आज विदर्भाच्या दौ-यावर आहेत. राज ठाकरे यांची आझ यवतमाळमधील वणीत सभा होणार आहे. त्यानंतर राज ठाकरे यांची पुण्यात सभा होणार आहे. त्यानंतर राज डोंबिवलीत सभा घेतील. शरद पवार आणि अजित पवार यांची आज सभा होणार आहे. शरद पवार यांची संध्याकाळी नगर जिल्ह्यातील कोपरगावात सभा होणार आहे. तर अजित पवार यांची खर्डा इथं प्रचार सभा होईल. प्रकाश आंबेडकर यांची नागपूरमध्ये पत्रकार परिषद तर मराठवाड्यात औरंगाबाद, परभणीला सभा होणार आहे. इतर बातम्या - ‘भाजपविरोधात पुरावे आहेत फक्त एका व्यासपीठावर या’ प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट राजनाथ सिंह यांची उत्तर भारतीय मतदारांवर चांगलीच पकड महाराष्ट्राच्या विधानसभेच्या प्रचारासाठी उत्तर भारतीय बहुल मतदार असणाऱ्या भागांमध्ये आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह भाजपाच्या प्रचारासाठी मुंबईत येत आहे. सायंकाळी चार वाजता गोरेगाव पश्चिम येथील भाजप कार्यालय येथून राजनाथसिंह यांचा रोड शो होणार आहे. त्यानंतर चारकोप येथील 60 फूट डीपी रोड येथे राजनाथ सिंह यांची सभा होणार आहे. इतर बातम्या - उद्धव ठाकरेंची मोदी-फडणवीसांवर टीका, या मुद्द्यामुळे युतीत तडका चारकोप गोरेगाव तसेच मुंबईतील दहिसर कांदिवली या भागांमध्ये उत्तर भारतीय मतदार मोठ्या संख्येने आहेत. राजनाथ सिंह भाजपचे माजी अध्यक्ष तसेच गृहमंत्री या पदांवर यादी काम पाहिलं आहे. मूळचे उत्तर प्रदेशचे असलेले लखनऊ लोकसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व करत असलेले राजनाथ सिंह यांची उत्तर भारतीय मतदारांवर चांगलीच पकड असल्याने राजनाथ सिंह उत्तर भारतीय मुंबईतील मतदारांवर प्रभाव टाकतील असं भाजप नेत्यांना वाटतं. त्यामुळे राजनाथ सिंह यांची रोडशो आणि सभासद आयोजन करण्यात आला आहे. मागील लोकसभा विधानसभा आणि मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसच्या हक्काचा असणारा उत्तर भारतीय मतदार भाजपकडे गेल्याने भाजपला चांगलाच फायदा झाल्याचे दिसून येते.