JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / बापरे! एका मतदानासाठी भूमी पेडणेकरने चक्क एवढ्या तासांचा प्रवास केला

बापरे! एका मतदानासाठी भूमी पेडणेकरने चक्क एवढ्या तासांचा प्रवास केला

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यातील मतदान 29 एप्रिलला झाले. या दिवशी मतदान करावं म्हणून भूमीने असं काही केलं की तिचं आज प्रत्येकजण कौतुक करत आहेत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 एप्रिल- ‘दम लगा के हैशा’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या भूमी पेडणेकरचं नाव कोणाला माहीत नाही असं होणं शक्य नाही. एकाहून एक सरस सिनेमांमध्ये काम केल्यानंतर लवकरच भूमी अनुराग कश्यपच्या ‘सांड की आंख’ सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाचं चित्रीकरण सध्या पुण्यात सुरू आहे. भूमीसह इतर कलाकारही पुण्यात काम करत आहेत. याचवेळी महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यातील मतदान 29 एप्रिलला होते. या दिवशी मतदान करावं म्हणून भूमीने असं काही केलं की तिचं आज प्रत्येकजण कौतुक करत आहेत. रणबीरशी झालेल्या ब्रेकअपवर कतरिना म्हणाली, ‘मला मित्रांपेक्षा आता शत्रूवर जास्त विश्वास आहे’

मीडिया रिपोर्टनुसार, भूमीने आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आणि आपलं कर्तव्या पार पाडण्यासाठी आठ तासांचा प्रवास करत मतदान केलं. भूमीने मतदानानंतरचा आपला फोटो सोशल मीडियावर शेअरही केला. विशेष म्हणजे मतदान करता यावं यासाठी तिने दिग्दर्शकाकडे एका दिवसाची सुट्टीही मागितली होती. मतदान करण्यासाठी ती पुण्याहून मुंबईत आली आणि मतदान झाल्यावर ती पुन्हा पुण्यात गेली. कॅन्सर फ्री झाले ऋषी कपूर? भाऊ रणधीर कपूर यांनी केला खुलासा

मतदानाबद्दल बोलताना भूमी म्हणाली की, ‘भारतीय नागरिकाच्या नात्याने मी दरवेळी मतदान करते. माझ्या सिनेमाचं चित्रीकरण सुरू होतं पण तरीही मी दिग्दर्शकाला आणि प्रॉडक्शनच्या टीमला सांगितलं की मी डबल शिफ्ट करून काम संपवेन आणि मुंबईत मतदानाला जाईल. हा आठ तासांचा प्रवास थकवणारा होता. पण प्रत्येक मत हे मोलाचं आहे.’ ‘नाणं एकदम खणखणीत’, गॉडफादर नसतानाही ‘हे’ सेलिब्रिटी बॉलिवूडमध्ये यशस्वी कोणकोणत्या सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क पाहा SPECIAL REPORT

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या