JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / भारतात लवकरच दाखल होणार Redmi Note 10 सीरिज, तारीखही केली जाहीर!

भारतात लवकरच दाखल होणार Redmi Note 10 सीरिज, तारीखही केली जाहीर!

रेडमी नोट 10 (Redmi Note 10) हा फोन दोन प्रकारांमध्ये सादर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे

जाहिरात

Redmi Note 9 Pro: Uber-hit मिड-रेंज डिव्हाईस Redmi Note 9 Pro ग्रेट इंडियन फेस्टिवलमध्ये सूटसह उपलब्ध आहे. पहिल्यांदाच Redmi Note 9 Pro च्या किंमतीत कमी झालेली दिसणार आहे. परंतु कंपनीने अद्याप याची किंमत जाहीर केलेली नाही. याची किंमत 10,099 आणि याच्या सध्याच्या 16,999 रुपयांपर्यंत असू शकते.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई ,15 फेब्रुवारी :  शाओमी (Xiaomi) कंपनीने आपल्या नोट या लोकप्रिय सीरिजमधील पुढील म्हणजेच रेडमी नोट 10 (Redmi Note 10) ही सीरिज मार्च 2021 मध्ये सादर करणार असल्याचं अलीकडेच जाहीर केलं होतं. आता या फोनच्या लाँचिंगची तारीख 10 मार्च असल्याचं समोर आलं आहे. अॅमेझॉनच्या लीक झालेल्या लिस्टवरून ही माहिती समोर आली आहे. गिझ्मोचायनाने अॅमेझॉनच्या लिस्टिंगच्या आधारे ही माहिती पहिल्यांदा समोर आणली या सीरिमध्ये रेडमी नोट  10  प्रो रेडमी नोट  10 - 5G  आणि रेडमी नोट  10 - 4G  हे फोन लाँच केले जाणार आहेत याच्या फीचर्सविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. हे ही वाचा- व्हा अधिक स्मार्ट! आता मोबाइल अॅपच्या माध्यमातून बाळगा Aadhaar Card; वाचा! भारतीय स्टॅंडर्ड ब्युरो (BIS) आणि यूएस फेडरल कम्युनिकेशन्स कमिशन (FCC) यांच्या सर्टिफिकेशन साइटवरदेखील हे फोन दिसत आहेत. परंतु यांच्या फीचर्स सं-दर्भातील कोणतीही माहिती समोर आलेली नाही. शाओमी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनू कुमार जैन यांनी केलेल्या ट्विटमध्ये ‘सबसे स्मूथ’ असा उल्लेख केल्यानं हा फोन नवीन SoCs सह मिळण्याची शक्यता आहे. तसंच, त्याचा फ्रेश रेटही जास्त असण्याची शक्यता आहे. हे ही वाचा- ड्रायव्हिंगच्या वेळी Google Map वापरताय? वेळीच सावध व्हा, होईल हजारोंचा दंड 8GB  रॅमचा फोनही येऊ शकतो रेडमी नोट 10 (Redmi Note 10) हा फोन दोन प्रकारांमध्ये सादर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज आणि 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज असे ते प्रकार असतील. रेडमी नोट 10 Pro हा फोन 6 जीबी + 64 जीबी स्टोरेज, 6 जीबी + 128 जीबी स्टोरेज, आणि 8 जीबी +128 जीबी स्टोरेज या प्रकारांमध्ये मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या फोनमध्ये 64 मेगापिक्सेल कॅमेरा आणि 5050mAh क्षमतेची बॅटरी असेल आणि चार्जिंगसाठी फास्ट चार्जिंगची सुविधा असलेला चार्जरदेखील मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता या फोनच्या लाँचिंग डेटकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या