JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / बस्स! फक्त 10 दिवसांतच...; टेन्शन वाढवणाऱ्या Delta plus बाबत मोदी सरकारने दिली महत्त्वाची अपडेट

बस्स! फक्त 10 दिवसांतच...; टेन्शन वाढवणाऱ्या Delta plus बाबत मोदी सरकारने दिली महत्त्वाची अपडेट

देशभरात डेल्टा प्लस (Delta plus) कोरोनाचे एकूण 48 रुग्ण सापडले आहेत, तर दोघांचा मृत्यू झाला आहे.

जाहिरात

नियमित स्वरूपात हे औषध घेतल्याने फुफ्फुसातील संक्रमण कमी केलं जाऊ शकतं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 25 जून : कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आलेली असताना डेल्टा प्लस (Corona delta plus) व्हेरिएंट आता डोकेदुखी ठरतं आहे. देशात डेल्टा प्लस (Delta plus) कोरोनाचे एकूण 48 रुग्ण सापडले आहेत, तर दोघांचा मृत्यू (Delta plus death)  झाला आहे. 11 राज्यांमध्ये डेल्टा प्लसने शिरकाव केलेला आहे. सर्वाधिक 21 रुग्ण महाराष्ट्रात (Delta plus in Mahrashtra) सापडले आहे. देशातील दोन मृतांपैकी एक मृत्यू महाराष्ट्रात झाला आहे. त्यामुळे चिंता अधिक वाढली आहे. डेल्टा प्लस कोरोनावर सध्या दिली जाणारी कोरोना लस किती प्रभावी आहे, असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. ही लस डेल्टा प्लस कोरोनापासून बडाव करेल का? याबाबत आता केंद्र सरकारने महत्त्वाची माहिती दिली आहे. आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितलं की, कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटमध्ये (Corona Delta Variant) म्युटेशन प्रेशरमुळे आणि त्याला तसं वातावरण मिळाल्याने होतं. एप्रिल-जूनपासून डेल्टा, डेल्टा प्लस व्हेरिएंटचं कल्चर टेस्ट होते आहे. यामध्ये ़डेल्टा व्हेरिएंटमुळे सार्वजनिक आरोग्यावर फारसा परिणाम होत नाही. काही व्हायरस इन्फेक्शन जास्त पसरवतात. हे वाचा -  फक्त एका फुफ्फुसासह कोरोनाशी लढली; 12 वर्षांच्या दिव्यांग मुलीची व्हायरसवर मात सध्या कोरोनापासून बचावासाठी ज्या लशी दिल्या जात आहेत, त्या डेल्टा प्लस व्हेरिएंटवर किती प्रभावी आहेत हे येत्या 7 ते 10 दिवसांत समजेल. कोरोनाच्या बदलत्या व्हेरिएंटनुसार लशीमध्येही बदल होईल की नाही याबाबतही आयसीएमआर संशोधन करत आहे, असं डॉ. भार्गव यांनी सांगितलं. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार भारतासह 85 देशांमध्ये डेल्टा व्हेरिअंटची प्रकरणं आहेत. तर डेल्टा प्लसची भारतासह काही मोजक्याच देशांमध्ये प्रकऱणं समोर आली आहेत. जगभरात डेल्टा प्लस संक्रमणाची कमी प्रकरणं आहेत, त्यामुळे यावर लशीचा प्रभाव समजून घ्यायला वेळ लागेल. हे संक्रमण वाढत आहे, याबाबत काही पुरावा नाही. डेल्टा प्लस व्हेरिएंटवर लशीचा प्रभाव समजून घेण्यासाठी अधिक डेटाची गरज आहे. हे वाचा -  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 776 डॉक्टरांचा मृत्यू, सर्वाधिक बिहारमध्ये आरोग्य मंत्रालयाच्या (Union Health Ministry) म्हणण्यानुसार, डेल्टा प्लस व्हेरिएंटला कसे सामोरे जावे यासंबंधी माहिती देण्यासाठी राज्यांना पत्र लिहिण्यात आलं आहे. भारतीय एसएआरएस-सीओव्ही -2 जीनोमिक कन्सोर्टियाच्या नुकत्याच झालेल्या निष्कर्षांच्या आधारे महाराष्ट्र, केरळ आणि मध्य प्रदेश यांना मार्गदर्शक तत्त्वांनुसार व्हेरिएंटवर काम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या