JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / Diwali 2022 : बायको किंवा बहिणीला द्या 'सोन्याचं गिफ्ट', 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर घसरले

Diwali 2022 : बायको किंवा बहिणीला द्या 'सोन्याचं गिफ्ट', 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर घसरले

पाडव्याआधी जाणून घ्या सोन्या चांदीचा बदलता ट्रेंड, भाऊबीजपर्यंत वाढणार की कमी होणार?

जाहिरात

Gold rate

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : दिवाळीचा पहिला दिवस लक्ष्मीपूजन आणि नरकचतुर्दशीचा कोरोना संकटानंतर पहिल्यांदाच मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली जात आहे. राज्यभरात उत्साहाचं वातावरण आहे. सणासुदीच्या काळात सोनं-चांदी खरेदी केलं जातं. धनत्रयोदशीला जळगाव आणि मुंबईत सोनं खरेदीसाठी अक्षरश: झुंबड उडाली होती. त्यानंतर सोन्याच्या दरातही वाढ झाली होती. धनत्रयोदशीला सोन्याची मागणी वाढल्यानंतर दरही वाढले. रविवारी सोन्याचे दर 52 हजार 500 हून अधिक होते. आज सोन्याचे दर थोडे उतरले आहेत. लक्ष्मीपूजनाला आपल्याकडे सोनं खरेदी करत नाहीत. मात्र पाडवा आणि भाऊबीज पुन्हा सोनं खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी पाहायला मिळू शकते. त्यामुळे सोन्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सोने खरेदी करण्यासाठी मुंबईतील झवेरी बाजारात ग्राहकांची गर्दी झाली आहे. आज सोन्याचे दर प्रतीतोळा 51 हजार 425 आहेत. 22 कॅरेट सोन्याचा दर 46,850 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. त्यामुळे भाऊबीज किंवा पाडव्यासाठी सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही आज घेऊ शकता.

सोने की चांदी कोणता म्युच्युअल फंड तुम्हाला देईल जास्त रिटर्न?

भाऊबीज-पाडव्याला पुन्हा सोन्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. तसंच पुढे लगीन सराई असल्याने आता लवकर सोन्याचे दर खाली उतरतील याची शक्यता कमी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्यावर दबाव आहे. डॉलरचं मूल्य वाढत आहे तर रुपया नीचांकी पातळीवर जात आहे. सोनं कितीही महाग झालं तरी तो जिव्हाळ्याचा विषय असल्याने अनेकजण त्यामध्ये गुंतवणूक करणं किंवा दागिना करणं काही सोडत नाहीत. येत्या काळात सोन्यात चढ उतार पाहायला मिळू शकतात. डॉलरमुळे सोन्यावर दबाव असल्याने हे बदल पाहायला मिळू शकतात. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करताना तुम्ही दर तपासले पाहिजेत.

सोनं नाही तर ‘डिजिटल गोल्ड’ खरेदी करा, ना चोरीची चिंता, ना गहाळ होण्याची भिती, अशी आहे प्रोसेस

शेअर मार्केटमधील सोन्याचे दर हे आतंरराष्ट्रीय बाजारपेठेतील सोन्याच्या दरावर अवलंबून असतात. प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही बाजारपेठेत सोनं खरेदीसाठी जाता तेव्हा मात्र दर वेगळे असतात. कारण ते दर इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन ठरवत असते. सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.

24, 22, 18 की 14 यात नेमका काय फरक?

संबंधित बातम्या

तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अ‍ॅप बनवलं आहे. ‘BIS Care App’ द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता.

या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या