मुंबई, 5 मे- शाहरुख खान आणि करण जोहर किती जवळचे मित्र आहेत हे तर साऱ्यांनाच माहीत आहे. शाहरुखची पत्नी गौरी खान आणि करणमध्येही वेगळ्या प्रकारचं बॉण्डिंग पाहायला मिळतं. रविवारी सकाळी गौरी एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमध्ये तिच्यासोबत मुलगा अब्राम खान आणि करणची रुही आणि यश ही दोन्ही मुलं दिसत आहेत. गौरीने हा फोटो शेअर करताच अवघ्या काही मिनिटांतच व्हायरल झाला. शाहरुख खाननेही हा फोटो पाहिला आणि त्याने फोटोवर ‘आई तुला सलाम’ अशी खास कमेन्टही दिली. गौरीने इन्स्टाग्रामवर तीनही मुलांसोबत सुट्टीचा आनंद लुटणारा फोटो शेअर केला.
सलमानच्याच पावलांवर पाऊल ठेवतं कतरिनानेही घेतली महागडी कार या फोटोत गौरीच्या मांडीवर अब्राम बसला आहे तर तिच्या बाजूला रूही आणि यश बसले आहेत. या फोटोला कॅप्शन देताना गौरीने लिहिले की, ‘तीन मस्तीखोरांसोबत वेळ घालवताना…’ याच फोटोला बॉलिवूडच्या बादशहाने कमेंट करत म्हटलं की, ‘आई तुला सलाम’ मलायका अरोरानेही या फोटोला कमेंट करत म्हटलं की, खूपच सुंदर. तर अभिनेता संजय कपूरच्या पत्नीने महीप कपूरनेही स्माइली टाकून फोटोवर कमेंट केली.
सलमान नाही तर ‘हा’ अभिनेता आहे कतरीनाचा गुरू, खुद्द भाईजाननंच केला गौप्यस्फोट शाहरुख आणि गौरी दोघंही सोशल मीडियावर फार सक्रीय आहेत. गौरी स्वतः एक प्रसिद्ध इंटेरिअर डिझायनर आहे. ती तिच्या अकाउंटवर अनेकदा तिच्या कामांचे फोटो शेअर करते. या दोघांचे मुंबईतील मतदानावेळचेही अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मतदानासाठी शाहरुख यावेळी खास अब्रामला घेऊन गेला होता. मुलाला मतदान केंद्रावर घेऊन जाण्यामागे नक्की काय कारण आहे असा प्रश्नही सोशल मीडियावर विचारण्यात आला होता. याचं उत्तर देताना किंग खान म्हणाला होता की, ‘अब्रामला ‘वोटिंग’ आणि ‘बोटिंग’ या शब्दातला फरक कळत नव्हता. तोच समजवण्यासाठी त्याला मतदान केंद्रावर घेऊन गेलो होतो.’ अशाप्रकारे तारक मेहतासाठी आता तुम्ही निवडू शकता दया बेन VIDEO: ‘त्या’ बोल्ड दृश्याबद्दल प्रिया बापटनं अखेर मौन सोडलं