चंद्रपूर, 8 जुलै : चंद्रपूर जिल्हा परिसरातील जंगलात वाघ (Tiger in Chandrapur) पाहायला मिळतात. यातच आता वाघाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मात्र, यावेळी हा साधा वाघ नाहीये. तर प्रसिद्ध असलेला गब्बर वाघ (Gabbar Tiger on Road) होता. चंद्रपूर जिल्ह्यातील आपल्या भारदस्त शरीरयष्टी साठी प्रसिद्ध असलेला गब्बर वाघ हा वाहतुकीच्या रस्त्यावर पाहायला मिळाला. (Chandrapur Forest) काय आहे नेमका प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील गब्बर वाघ हा आपल्या भारदस्त शरीरयष्टी साठी प्रसिद्ध आहे. गब्बर वाघ हा नागभीड ब्रह्मपुरी रोडवर ओलढतांना शेघाट शिवारात नागरिकांना पाहायला मिळाला. गब्बर वाघाच्या डरकाळीमुळे त्याला रस्ता ओलांडायचे आहे हे नागरिकांना लक्षात आल्यानंतर दोन्ही बाजूची वाहतूक थांबवण्यात आली होती. तर गब्बर वाघाने रस्ता ओलांडल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली. याचकाळात काही दुचाकीस्वारांनी आपला जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला. यासंबंधीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ दोन दिवसांपूर्वीचा असल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा - Aurangabad : पावसाळ्यात ‘सर्पदंश’ होऊ नये म्हणून काय काळजी घ्याल? पहा VIDEO
काही दिवसांपूर्वी वाघाचा आई मुलावर हल्ला -
काही दिवसांपूर्वी आईच्या डोळ्यासमोरच तिच्या पोटच्या मुलाचा मृत्यू (Son death in front of Mother) झाला होता. चंद्रपूर जिल्हा परिसरातील जंगलात वाघ पाहायला मिळतात. याच वाघामुळे एका मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. ही घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रह्मपुरी तालुक्यात घडली होती. वाघाने केलेल्या हल्ल्यात एका 50 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. राजेंद्र अर्जुन कमादी, असे मृताचे नाव होते. मृत व्यक्ती ब्रह्मपुरी तालुक्याच्या हल्दी गावातील रहिवासी होता. तसेच तो मजुरी काम करत होता.