JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / तुकाराम मुंढे कामाला लागले, लेटलतिफांचा एका दिवसाचा पगार कापला

तुकाराम मुंढे कामाला लागले, लेटलतिफांचा एका दिवसाचा पगार कापला

तुकाराम मुंढे यांनी पहिल्याच दिवशी पुणे परिवहन सेवेतील लेटलतिफांना दणका दिलाय. 125 कर्मचाऱ्यांचा कामावर उशिरा आल्याबद्दल एका दिवसाचा पगार कापलाय

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

30 मार्च : तुकाराम मुंढे यांनी पहिल्याच दिवशी पुणे परिवहन सेवेतील लेटलतिफांना दणका दिलाय. परिवहन सेवेतील 125 कर्मचाऱ्यांचा कामावर उशिरा आल्याबद्दल एका दिवसाचा पगार कापलाय. नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदावरून तुकाराम मुढे यांची बदली झाली. त्यांची नियुक्ती पुणे परिवहनच्या सीएमडीपदी झाली.  पीएमपीएमएलची सूत्र स्विकारल्या स्विकारल्या मुंढे यांनी आपल्या कामाचा धडाका सुरू केलाय. यानुसार परिवहन सेवेतील १०० नादुरूस्त बसेस त्यांनी त्वरीत दुरूस्तीला पाठवल्यात. या १०० बसेस त्यांनी १५ दिवसांत दुरूस्त करून पुन्हा रस्त्यांवर आणायला सांगितलंय. तसंच उशिराने हजर राहणाऱ्यांचा एका दिवसाचा पगार कापून वेळेत येण्याचा धडा शिकवला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या