JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / इमारतीला लागली आग, बाल्कनीतून साडीच्या मदतीने मुलीने मारली उडी पण..., LIVE VIDEO

इमारतीला लागली आग, बाल्कनीतून साडीच्या मदतीने मुलीने मारली उडी पण..., LIVE VIDEO

कल्याण पश्चिममध्ये खडकपाडा भागातील इमारतीला आग लागली होती

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कल्याण, 03 ऑक्टोबर : उंच इमारतींमध्ये आग लागल्याच्या घटनेमुळे बचावकार्य करण्याबाबत नेहमी प्रश्नचिन्ह निर्माण होत असतात. अशातच कल्याणमध्ये एका इमारतीला आग लागली होती. यावेळी आगीपासून वाचण्यासाठी चक्क साडीचा वापर करण्यात आला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. कल्याण पश्चिममध्ये खडकपाडा भागातील इमारतीला आग लागली होती. मोहन अल्टीजा असे इमारतीचे नाव आहे. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली होती. आग लागल्यामुळे इमारतीमध्ये एकच खळबळ उडाली होती. रहिवाशांनी तातडीने याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना दिली. अग्निशमन दलाच्या गाड्यांनी लगेच घटनास्थळाकडे धाव घेतली.

तिसऱ्या मजल्यावर आग लागल्यामुळे फ्लॅटमधील रहिवाशांनी बाल्कनीतून दुसऱ्या फ्लॅटमध्ये साडीच्या मदतीने जाऊन आपला जीव वाचवला. बाल्कनीमध्ये साडीच्या मदतीने एक एक करून खाली उतरले. यामध्ये महिला आणि लहान मुलांना सुद्धा एकमेकांची मदत घेऊन खाली उतरवण्यात आलं. हा सगळा प्रकार मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

(बीड: 2 वर्षाच्या मुलाला विहिरीजवळ घेऊन गेली आई; दुसऱ्याच क्षणी भयानक घटना )

अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. पण तोपर्यंत रहिवाशांनी आपल्या जीव वाचवला. अग्निशमन दलाच्या जवानांनी काही तासांमध्ये आगीवर नियंत्रण मिळवले. तिसऱ्या मजल्यावर आग लागल्याने दोन ते तीन फ्लॅट आगीच्या भक्षस्थानी सापडले होते.  या आगीत इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या