JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / Dhule Accident : कंटेनर कारला उडवून हॉटेलमध्ये शिरला, 9 जणं जागीच गेले; थरकाप उडवणारं CCTV फुटेज

Dhule Accident : कंटेनर कारला उडवून हॉटेलमध्ये शिरला, 9 जणं जागीच गेले; थरकाप उडवणारं CCTV फुटेज

Dhule Container Accident In Shirpur Taluka : हा अपघात इतका भीषण होता की मृतदेहाच्या चिंधड्या उडाल्या.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दिपक बोरसे/धुळे, 4 जुलै : समृद्धी महामार्गावरील बुलढाणा येथे झालेल्या अपघातापासून लोक सावरत असताना मुंबई आग्रा महामार्गावर पळासनेर गावाजवळील अपघातात 9 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. बुलढाणा अपघातात 25 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. या अपघाताचा धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार, या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला असून 15 जणं जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ब्रेक फेल झाल्याने कंटेनर एका हॉटेलमध्ये शिरला. या दुर्घटनेत 9 जणांचा चिरडून जागीच मृत्यू झाला तर तर पंधरा ते वीस जणं जखमी झाले आहेत. मृत्यू पडलेल्यांची संख्या अजून वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या अपघातानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातस्थळी मोठ्या संख्येत जमाव एकत्र आला आहे.

संबंधित बातम्या

हा अपघात इतका भीषण होता की, 9 जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह रस्त्यावर छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. बातमी अपडेट होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या