नवी दिल्ली, 10 जून: पैगंबर मोहम्मद यांच्यावर कथित टिप्पणी केल्याप्रकरणी भाजपच्या (former BJP spokesperson) माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्या अटकेवरून दिल्लीतील जामा मशिदीबाहेर निदर्शने (Protests continue outside) सुरू आहेत. शुक्रवारच्या नमाजानंतर लोकांनी जामा मशिदीबाहेर जोरदार निदर्शने केली. तसंच नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या अटकेची मागणी केली. यावेळी जामा मशिदीबाहेर मोठी गर्दी दिसून आली. मात्र, पोलीसही घटनास्थळी तैनात असून लोकांना समजवण्याचा प्रयत्न करत आहेत. न्यूज एजन्सी ANI नुसार दिल्ली पोलिसांनी सांगितले की, भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा आणि भाजप नेते नवीन कुमार जिंदाल यांच्या वक्तव्याविरोधात लोकांनी जामा मशिदीत निदर्शने केली. आम्ही लोकांना तेथून हटवले असून परिस्थिती आता नियंत्रणात आहे.
त्याचवेळी जामा मशिदीचे शाही इमाम म्हणाले की, आंदोलक कोण आहेत हे आम्हाला माहित नाही, मला वाटते ते AIMIM किंवा ओवेसी लोकांचे आहेत. त्यांना आंदोलन करायचे असेल तर ते करू शकतात, पण आम्ही त्यांना पाठिंबा देणार नाही, असे आम्ही स्पष्ट केले. केवळ दिल्लीच्या जामा मशिदीतच नाही तर सहारनपूर आणि लखनऊमध्येही शुक्रवारच्या नमाजानंतर निदर्शने होत आहेत. शुक्रवारी दिल्लीच्या जामा मशिदीपासून ते कोलकाता, लखनऊपर्यंत नूपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. यूपीची राजधानी लखनऊशिवाय देवबंद आणि सहारनपूरमध्ये नुपूरच्या अटकेच्या मागणीसाठी मोठा गदारोळ झाला होता. देवबंदमध्ये पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. ISI नं रचला होता सिद्धू मुसेवाला हत्येचा कट?, शूटर महाकालनं केला मोठा खुलासा शुक्रवारच्या नमाजानंतर लोकांनी नूपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत मशिदीमध्ये निदर्शने केली. आंदोलकांनी नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. यासोबतच लोकांनी जोरदार घोषणाबाजीही केली. मात्र, आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, जामा मशिदीच्या शाही इमामचे म्हणणे आहे की त्यांना या निषेधाबाबत काहीही माहिती नाही. तसेच मशिदीकडून आंदोलन पुकारण्यात आले नाही. काय आहे नेमकी घटना? भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी एका टीव्ही डिबेटमध्ये पैगंबर मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केली होती. यानंतर वाद अधिकच वाढला. नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचा अरब देशांनीही निषेध केला होता. यानंतर भाजपने नुपूर शर्मा यांना पक्षातून निलंबित केले. वाद वाढल्यानंतर नुपूर शर्माने माफीही मागितली होती आणि आपले वक्तव्य मागे घेतले होते. त्या म्हणाल्या होत्या की, मी माझे शब्द मागे घेते. कोणाला दुखावण्याचा माझा हेतू नव्हता, माझ्या बोलण्याने कोणाच्या धार्मिक भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द मागे घेते.