मुंबई, 16 डिसेंबर: एकीकडे काही दिवसांपूर्वी कोरोना व्हायरस (corona virus) आटोक्यात आल्याचं चित्र होतं. मात्र आता पुन्हा एकदा हे चित्र बदलताना दिसत आहे. कोरोना व्हायरसचे रुग्ण पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. कोरोना व्हायरसचा नवीन ओमायक्रॉन (Omicron variant) व्हेरिएंटनं शिरकाव केल्यानं जगभरात चिंतेचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य प्रशासन सतर्क झालं आहे. भारत (India) देशातही या व्हेरिएंटचे (Variant) रुग्ण आढळून येत आहे. दिवसेंदिवस या रुग्णांची संख्या देशात वाढत चालली आहे. त्यातही मुख्य म्हणजे या व्हेरिएंटचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात आढळून आले आहेत. त्यामुळे राज्य सरकारची (State Government) चिंता वाढली आहे. आता यासंदर्भातली महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जानेवारी महिन्यात महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात ओमायक्रॉनची प्रकरणे आढळून येण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात आलं आहे. तज्ज्ञांनी राज्य मंत्रिमंडळाला यासंदर्भातली माहिती दिल्याचं समजतंय. हेही वाचा- नेत्याची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या, छातीत झाडल्या दोन गोळ्या दरम्यान जानेवारी महिन्यात आढळून येणारे हे रुग्ण केवळ मोठ्या शहरांतील नसून लहान शहरांतीलही असतील, असंही तज्ज्ञांनी सांगितलं आहे. त्यातच दोन्ही डोस लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी लसीकरण मोहीम हाती घेण्याचं निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य प्रशासनाला दिले आहेत. Omicron चे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र राज्यात देशात आतापर्यंत ओमायक्रॉनची 73 रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 32 रुग्ण आढळले आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या रिपोर्टनुसार, महाराष्ट्रात आढळलेल्या चार नवीन संसर्गांपैकी 2 रुग्ण उस्मानाबादमधील, 1 मुंबईतील आणि एक बुलढाण्यातील आहे. यापैकी 3 रुग्णांचे लसीकरण करण्यात आले आहे. बाधितांमध्ये 16 ते 67 वयोगटातील एक महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. सर्व रुग्ण लक्षणे नसलेले आहेत. त्याचवेळी राज्यात बुधवारी कोरोनाचे 925 नवे रुग्ण आढळून आले असून 10 जणांचा मृत्यूही झाला आहे. राज्यातले चारही रुग्ण आयसोलेट प्राथमिक माहितीनुसार, उस्मानाबाद येथील बाधित हा शारजाहून आला असून दुसरा रुग्ण त्याच्या संपर्कातील आहे. याशिवाय बुलढाण्यातील वृद्ध व्यक्ती दुबईच्या ट्रिपवरून परतले होते आणि दुसरा रुग्ण मुंबईहून आयर्लंडला गेला होता. या सर्वांना रुग्णालयात अलग ठेवण्यात आले आहे. तसेच या रुग्णांच्या जवळच्या संपर्काचा शोध घेतला जात आहे. 929 रुग्णांना डिस्चार्ज महाराष्ट्रात बुधवारी 929 कोरोना बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून 6,467 रुग्ण सक्रिय आहेत. तसेच राज्यातील रिकव्हरी दर 97.72% आहे. ताज्या अपडेटनुसार, 24 तासांत कोविड-19 मुळे 10 मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर 2.12% आहे. सध्या 75,868 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत आणि 864 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.