JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / धक्कादायक! आखाड्यात कोचने केला गोळीबार; 5 जणांचा मृत्यू तर तिघे जखमी

धक्कादायक! आखाड्यात कोचने केला गोळीबार; 5 जणांचा मृत्यू तर तिघे जखमी

Rohtak Mehar Singh Akhada Firing Update: जाट कॉलेजच्या आखाड्यात सायंकाळी 7 वाजता सोनीपतमधील बरोदा येथे राहणारे कोच सुखविंदर चर्चा करण्यासाठी म्हणून आखाड्यात घुसले. यानंतर आरोपीने गोळीबार सुरू केला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रोहतक, 12 फेब्रुवारी : हरियाणाची राजधानी रोहतकमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. येथे पाच जणांचा गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणात 3 जणं जखमी असून त्यांच्यावर जवळील रुग्णालयात उपचार सुरू आहे. पाच मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. मीडियाच्या रिपोटनुसार, रोहतक शहरातील जाट कॉलेजात जिम्नॅशियम हॉलमध्ये कोच आणि खेळाडूंवर रात्री गोळीबार करण्यात आला. जाट कॉलेजच्या आखाड्यात सायंकाळी 7 वाजता सोनीपतमधील बरोदा येथे राहणारे कोच सुखविंदर चर्चा करण्यासाठी म्हणून आखाड्यात घुसले. यानंतर आरोपीने गोळीबार सुरू केला. यामध्ये तेथे हजर असलेल्या पाच जणांची हत्या झाली. यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. तर तिघेजण जखमी झाले आहेत. या गुन्ह्यामागे आखाड्यावर हक्क सांगणे आणि कौटुंबीय कारण असल्याचं सांगितलं जात आहे.

संबंधित बातम्या

इनकी गई जान साक्षी सतीश पूजा प्रदीप मनोज घायल अमरजीत तीन साल लड़का मात्र भर आखाड्यात झालेल्या या गोळीबारामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेबद्दल प्रश्न उपस्थित केला जात आहे. कोच बंदुक घेऊन आखाड्यात कसे आले हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. याशिवाय मृत जिम्नॅशिअमच्या खेळाडूंच्या पालकांकडूनही चौकशी करण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या