JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / पुन्हा एकदा महाराष्ट्राला मान, धनंजय चंद्रचूड होणार 50 वे सरन्यायाधीश!

पुन्हा एकदा महाराष्ट्राला मान, धनंजय चंद्रचूड होणार 50 वे सरन्यायाधीश!

लळीत यांनी आपल्या जागी न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांची सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करावी, अशी शिफारस केंद्राकडे केली

जाहिरात

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर :  सध्या उदय लळीत हे आपल्या देशाचे सरन्यायाधीश आहेत. मात्र, त्यांचा निवृत्ती काळ जवळ आल्यानं आता नवीन सरन्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. लळीत यांनी आपल्या जागी न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांची सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करावी, अशी शिफारस केंद्राकडे केली आहे. त्यामुळे न्यायमूर्ती चंद्रचूड आपल्या देशाचे 50वे सरन्यायाधीश म्हणून कार्य करणार आहेत. पुन्हा एकदा मराठी व्यक्तीला देशाचे सरन्यायाधीश होण्याची संधी मिळणार आहे. धनंजय हे माजी सरन्यायाधीश यशवंत व्ही. चंद्रचूड यांचे पुत्र आहेत. सरन्यायाधीश उदय लळीत यांनी 27 ऑगस्ट 2022 रोजी देशाचे 49वे चीफ जस्टीस म्हणून शपथ घेतली होती. ते 8 नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांनी पुढील सरन्यायाधीश म्हणून डी. वाय. चंद्रचूड यांची शिफारस करणारं पत्र केंद्र सरकारला दिलं आहे. सरन्यायाधीश लळीत यांच्या पूर्वीच्या बहुतांश सरन्यायाधीशांचा कार्यकाळ सरासरी दीड वर्षांचा राहिला आहे. मात्र, लळीत यांचा कार्यकाळ केवळ अडीच महिन्यांचा होता. सरन्यायाधीश लळीत निवृत्त झाल्यानंतर न्यायमूर्ती चंद्रचूड पुढील महिन्यात 9 नोव्हेंबर रोजी देशाचे 50वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील. डी. वाय. चंद्रचूड यांचा कार्यकाळ 2 वर्षं आणि 1 दिवसाचा असेल. ते 10 नोव्हेंबर 2024 रोजी निवृत्त होतील. (Kapil sibal election commission : शिवसेनेची भूमिकामांडणारे वकील कपील सिब्बलांची निवडणूक आयोगावर खरमरीत टीका) काही दिवसांपूर्वी, कायदा मंत्रालयानं सरन्यायाधीश लळीत यांना पत्र पाठवून भारताचे सरन्यायाधीश आणि सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी मेमोरँडम प्रक्रियेचा (MoP) भाग म्हणून त्यांच्या उत्तराधिकाऱ्याच्या नियुक्तीसाठी शिफारस पाठवण्यास सांगितलं होते.

सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्तींच्या नियुक्तीच्या प्रक्रियेशी संबंधित मेमोरँडम प्रक्रियेअंतर्गत (एमओपी), पत्र मिळाल्यानंतर सध्याचे सरन्यायाधीश त्यांच्या उत्तराधिकाऱ्याच्या नावाची शिफारस करण्याची प्रक्रिया सुरू करतात. सरन्यायाधीशांना हे पत्र विधी मंत्रालयाकडून दिलं जातं. देशातील सुप्रीम कोर्टात प्रत्यक्षात नियुक्त न्यायामूर्ती 34 आहे. मात्र, सुप्रीम कोर्टात सध्या तीन महिला न्यायाधीशांसह एकूण 29 न्यायमूर्ती कार्यरत आहेत. (शिवसेनेचा मोठा निर्णय, निवडणूक आयोगाविरोधात अखेर दिल्ली कोर्टात धाव) विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी सरन्यायाधीश लळीत यांनी सुप्रीम कोर्टात चार न्यायामूर्तींच्या नियुक्तीची शिफारस केली होती. या शिफारशीला पॅनेलमध्ये सहभागी असलेल्या न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी विरोध केला होता. चंद्रचूड यांचे प्रमुख निर्णय न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड हे माजी सरन्यायाधीश यशवंत व्ही. चंद्रचूड यांचे पुत्र आहेत. यशवंत चंद्रचूड 1978 ते 1985 या काळात देशाचे सरन्यायाधीश होते. देशातील माजी सरन्यायाधीशांचा पुत्र सरन्यायाधीश होत असल्याची ही देशाच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे. गर्भपात आणि श्रीराम मंदिराचा निकाल देणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या पीठामध्ये धनंजय चंद्रचूड यांचा समावेश होता तसंच त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांसंबंधी निर्णय दिले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या