JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / Chandrayan 3 Interesting Fact : कसा असेल चंद्रयानचा पुढचा प्रवास

Chandrayan 3 Interesting Fact : कसा असेल चंद्रयानचा पुढचा प्रवास

इतक्या प्रवासानंतर 5-6 ऑगस्ट 2023 ला चांद्रयान चंद्राच्या कक्षेत गेलेलं असेल, त्यानंतर चांद्रयानाची प्रोपल्शन यंत्रणा सुरु केली जाईल, व त्याला पुढं ढकललं जाईल.

जाहिरात

चंद्रयान 3

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : चांद्रयान-3 चा प्रवास चंद्राच्या भेटीसाठी सुरु झाला असला तरी हा प्रवास अद्याप खूपच दूर आहे. रविवार (16 जुलै 2023) रोजी चांद्रयान-3 ने स्वतःची दुसरी कक्षा यशस्वीपणे बदलली आहे. त्या पूर्वी ते पृथ्वीभोवती 31,650 किमी अंतरावरुन अंडाकार प्रदक्षिणा मारत होतं. 16 जुलै 2023 रोजी सायंकाळी चांद्रयान-3 ची दुसरी कक्षेतील फेरी पूर्ण झालीय. त्या पूर्वी ते लंबवर्तुळाकार कक्षेत 173 किमी पेरीजी (कमी अंतर) आणि 31,650 किमीच्या अपोजी (लांब अंतर) सह अंडाकार कक्षेत फिरत होते. ज्याचा अपोजी 15 जुलै 2023 रोजी दुपारी 41,762 किमीवर बदलला गेला. दुसर्‍या कक्षेतील फेरीनंतर चांद्रयानाचं सर्वांत जवळचं अंतर 173 किलोमीटरवरून सुमारे 220 किलोमीटरवर गेलं आहे. या दरम्यान चांद्रयान-3 चं इंजिन 42 सेकंदांसाठी सुरू करण्यात आलं होतं. सध्या इस्रोचे वैज्ञानिक त्याच्या कक्षाशी संबंधित डेटाचं विश्लेषण करत आहेत. इस्रोच्या एका वरिष्ठ शास्त्रज्ञानं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की, ‘या यानाची दुसऱ्या कक्षेतील फेरी योग्यरित्या पूर्ण झाली आहे. आता चांद्रयान 3 पृथ्वीपासून थोडं दूर गेलं आहे. या आठवड्यातच आणखी तीन कक्षांतील फेऱ्या होतील, अशी अपेक्षा आहे. ज्यामध्ये तिसरी, चौथी आणि पाचवी कक्षा बदलली जाईल. या तिन्ही कक्षांचा अपोजी बदलला जाईल. पेरीजी फक्त दुसऱ्या कक्षेसाठी बदलण्यात आलं आहे.

असा असेल पुढील प्रवास चांद्रयान-3 चा पुढील प्रवास कसा असेल, ते आता जाणून घेऊ. 31 जुलै 2023 रोजी चांद्रयान-3 पृथ्वीपासून दसपट दूर गेलं असेल. इस्रोचे शास्त्रज्ञ अपोजी बदलून त्याचं अंतर पृथ्वीपासून सुमारे 1 लाख किलोमीटर अंतरापर्यंत पोहोचेपर्यंत वाढवत राहतील. त्यानंतर शास्त्रज्ञ चांद्रयान-3 ला स्लिंगशॉटद्वारे ट्रान्सल्युनर इन्सर्शनमध्ये म्हणजे चंद्रासाठी निश्चित केलेल्या लांब पल्ल्याच्या सौर कक्षेत पाठवतील. 17 ऑगस्टला लॅंडरपासून प्रोपल्शन मॉड्युल होणार वेगळं इतक्या प्रवासानंतर 5-6 ऑगस्ट 2023 ला चांद्रयान चंद्राच्या कक्षेत गेलेलं असेल, त्यानंतर चांद्रयानाची प्रोपल्शन यंत्रणा सुरु केली जाईल, व त्याला पुढं ढकललं जाईल. म्हणजे हे यान चंद्राच्या 100 किमी कक्षेत पाठवलं जाणार आहे. 17 ऑगस्ट 2023 ला प्रोपल्शन सिस्टम चांद्रयानाच्या लॅंडर आणि रोव्हरपासून वेगळं होईल. त्यानंतर त्याला चंद्राच्या 100 बाय 30 किमीच्या कक्षेत आणलं जाणार आहे. हे असेल कठीण काम 23 ऑगस्ट 2023 ला चांद्रयान-3 चा वेग कमी केला जाईल. हे कठीण काम असणार असून, येथून त्याची लॅंडिंग सुरु होईल. यंदा लॅंडिंग क्षेत्रफळ चांद्रयान-2 पेक्षा वाढवलं आहे. विक्रम लॅंडरच्या पायाच्या ताकदीत वाढ केली आहे. नवीन सेन्सर बसवण्यात आले आहेत. नवीन सोलर पॅनल बसवण्यात आली आहेत. मागच्या मोहिमेतून हा धडा इस्रोने घेतला आहे. फक्त दुसऱ्याच कक्षेत पेरीजी बदलला प्रक्षेपणानंतर चांद्रयान-3 173X36,500 KM च्या पेरीजी-अपोजीसह लंबवर्तुळाकार कक्षेत होते. हे यान एका कक्षेतून दुसऱ्या कक्षेत जात असताना अपोजी वाढवली जाते. तिसर्‍या, चौथ्या आणि पाचव्या कक्षेतही हीच प्रक्रिया केली जाईल. चांद्रयान-3 ची कक्षा पृथ्वीभोवती पाच वेळा बदलली जाणार आहे. यामध्ये केवळ दुसऱ्याच कक्षेत पेरीजी बदलला आहे. दरम्यान, चांद्रयान-3 हे चंद्रावर ऑगस्ट महिन्यात यशस्वी लॅडिंग करण्याची शक्यता आहे. या दिवसाची जगभरातील भारतीय वाट पाहत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या