मुझफ्फरनगर (उत्तर प्रदेश), 07 ऑक्टोबर : एका भावाने स्वत:च्या बहिणीला (हत्या) गोळी घालून ठार मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बहिणीला ठार केल्यानंतर भावाने घटनास्थळावरून पळ काढला. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बहिणीच्या हत्येमागील कारण अद्याप कळू शकलेलं नाही. या संपूर्ण प्रकरणाक स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणीचं 3 महिन्यांआधी लग्न झालं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, बहिणीचा प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर ती पहिल्यांदा माहेरी कुटुंबीयांना भेटण्यासाठी आली होती. त्यावेळीच भावाने तिची हत्या केली. आरोपी भावाने बहिणीवर गोळ्या झाडल्या. बंदुकीचा आवाज येताच स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. उच्च अधिकाऱ्यांसह पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिस आरोपीला पकडण्याच्या प्रयत्नात आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू झाला आहे. ही घटना जानसाठ कोतवाली क्षेत्र परिसरातील कावळ गावची आहे. इतर बातम्या - महाराष्ट्र हादरला! भाजप नेत्यासह कुटुंबावर गोळीबार, 5 जणांचा मृत्यू प्रेमविवाहानंतर बहिण पहिल्यांदा आली होती माहेरी मृतक शबानाने तीन महिन्यांपूर्वी मुजफ्फरनगर येथे राहणा शहबाजशी प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर शबाना दोन दिवसांपूर्वी पहिल्यांदा तिच्या माहेरी आली होती. त्याचवेळी रविवारी संध्याकाळी काही कारणावरून शबानाचा भाऊ सनव्वरशी वाद झाला. याच्या रागात त्याने बहिणीला गोळ्या घालून ठार मारलं. दरम्यान, ‘आम्ही आरोपींना पकडण्याचा प्रयत्न करत असल्याची माहितील पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्याचबरोबर प्रत्येक मुद्द्यांचा तपास केला जात आहे. यामागील मुख्य कारण काय आहे, ते लवकरच समोर येईल. इतर बातम्या - मनसे उमेदवाराचा बाळासाहेबांच्या फोटोला नमस्कार, शिवसेना शाखेत जाऊन घेतलं दर्शन