हैद्राबाद, 5 जून : एक हैराण करणारी घटना हैद्राबादमधून समोर आली आहे. एका 16 वर्षीय मुलाने मोबाइल फोनवर ऑनलाइन गेमच्या (Online Game) नादात तब्बल 36 लाखांचं नुकसान केलं. मुलांमध्ये ऑनलाइन गेमचा विळखा वाढत चालला आहे. ऑनलाइन गेम खेळल्यामुळे आर्थिक नुकसान झाल्यानंतर अनेक व्यक्तीनी आत्महत्या केल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. हैद्राबादमधील अंबरपेट भागात राहणाऱ्या या मुलाने ऑनलाइन गेमचे पैसे भरण्यासाठी आपल्या आईच्या बँक खात्याचा वापर केला. गेमिंगच्या व्यसनामुळे पैसे बरबाद… हैद्राबाद पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेनुसार, मुलाने आपल्या आजोबांच्या मोबाइल फोनवर एक फ्री फायर गेमिंग अॅप (Free Fire App) डाउनलोड केला होता. गेम खेळण्यासाठी सुरुवातील 1500 रुपये आणि नंतर बँक खात्यातून 10 हजार रुपये लागणार होते. त्याला खेळाचं व्यसन लागल्यानंतर तो कुटुंबाला न सांगता यासाठी पैसे खर्च करू लागला. आईच्या बँक अकाऊंटमधून 36 लाख रुपये केले खर्च मृत पोलीस अधिकाऱ्यांचा 11 वीत शिकणारा मुलगा 1.45 लाख रुपयांपासून 2 लाखांपर्यंत पैसे भरत होता. जेव्हा त्याची आई पैसे काढण्यासाठी SBI बँकेत गेली, तर त्यात पैसे नसल्याचं कळालं. हे ऐकताच त्यांना धक्का बसला. खात्यातून एकूण 27 लाख रुपये खर्च करण्यात आले होते. यानंतर तिने HDFC बँकेतून खात्याचा तपास केला तर त्यातूनही 9 लाख रुपये गायब झाले होते. महिलेने सायबर क्राइमकडे याबाबत तक्रार केली. तिने पोलिसांना सांगितलं की, पतीच्या मृत्यूनंतर आलेली रक्कम तिने दोन बँकेत ठेवली होती. आता मात्र महिलेसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे.