मुंबई, 18 जानेवारी : आपल्याकडे असलेल्या पैशाची सुनियोजित (Investment Planning) वाढ व्हावी यासाठी आणि गुंतवणुकीची अनेक पर्याय शोधत असतो. शेअर मार्केट, LIC, PPF, म्युच्युअलं फंड्स असे अनेक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. मात्र क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) देखील गुंतवणूक म्हणून हळूहळू समोर येत आहे. यावर विश्वास ठेवणे थोडे कठीण आहे, परंतु क्रिप्टो मार्केटमध्ये काहीही शक्य आहे. गेल्या एका आठवड्यात एक पेनी टोकन Bitecoin ने 8,57,63,221 टक्के (8 कोटी टक्क्यांहून अधिक) झेप घेतली आहे. जरा सोप्या भाषेत समजून घ्यायचे झाले तर, जर एखाद्याने आठवड्याभरापूर्वी या टोकनमध्ये 1,000 रुपये गुंतवले असते, तर आतापर्यंत 85.76 कोटी रुपये झाले असते. Coinmarketcap च्या डेटानुसार, हे टोकन फक्त एका दिवसात 19,650 टक्के वाढले आहे. या उसळीनंतर, Bitecoin 0.000003271 डॉलरवरून 0.0006462 डॉलवरवर पोहोचले आहे. जर तुम्हाला हे डॉलर समजत नसेल तर आम्ही तुम्हाला रुपयात सांगायचे तर 24 तासांत Bitecoin 0.00024 पैशांवरून 0.048 पैशांवर गेला. तरीही त्याची किंमत भारतीय रुपयात 5 पैशांपेक्षा कमी आहे. Investment Options : यावर्षी ‘या’ तीन पद्धतीने चांगले पैसे कमवले जाऊ शकतात; चेक करा गुंतवणुकीचे पर्याय इकॉनॉमिक्स टाइम्समधील एका अहवालानुसार, या टोकनचे बाजार भांडवल 3 बिलियन डॉलरपेक्षा जास्त आहे. मात्र, टोकनचे प्रमाण सुमारे 21 टक्क्यांनी घटले आहे. व्हॉल्यूम 125,000 डॉलरपेक्षा थोडे जास्त आहे. सप्लायसाठी एकूण 6,10,000 Bitecoin टोकन आहेत, परंतु कमाल पुरवठा 1,000,000,000,000,000 पर्यंत मर्यादित आहे. तसेच, Binance स्मार्ट चेन प्लॅटफॉर्मवर आधारित Bitecoins जारी केले जातील आणि ERC20 मानकांचे पूर्णपणे पालन करतील. तज्ञ काय म्हणतात? क्रिप्टो मार्केट तज्ञ टोकनमधील फिशिंग क्रियाकलापांकडे लक्ष वेधले, ज्यामुळे अचानक वाढ झाली, अनेकांना त्याबद्दल आश्चर्य वाटले. तज्ज्ञ अशा मोहक सापळ्यांपासून दूर राहण्याचा सल्ला देतात. कमी गुंतवणुकीसह डबल फायदा, LIC ची खास योजना; मॅच्युरिटीवर मिळेल 110 टक्के रिटर्न सेल्फ सॉवरेन आयडेंटिटी प्लॅटफॉर्म EarthID चे रिसर्च अँड स्ट्रॅटेजी उपाध्यक्ष शरत चंद्रा म्हणाले की, बाइटकॉइनचा 90 टक्क्यांहून अधिक भाग फक्त पाच वॉलेट (एक प्रकारचे लोक) कडे आहे आणि हे व्हेल स्वेच्छेने किंमती बदलू शकतात फेरफार करु शकतात. हे खूप धोकादायक आहे. या BTC रिबेस टोकनद्वारे ऑफर केलेल्या पुरस्कारांपेक्षा जोखीम देखील खूप जास्त आहेत, त्यामुळे त्यांनी गुंतवणूकदारांना यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.