छोट्या तलावात भले मोठे मासे, वजन सोडा किंमत ऐकून व्हाल हैराण
पश्चिम चंपारण, 2 जून : बिहारमधील पश्चिम चंपारण या जिल्ह्यात आजकाल माणसांइतके मोठे मासे पाळले जात आहेत. जरी देशातील काही राज्यांमध्ये किंवा परदेशात मोठ्या माशांची शेती केली जात असली तरी, बिहारमधील चंपारण येथे अशी शेती प्रथमच केली जात आहे. साठी येथील राहणारे आनंद सिंह यांनी ही माशांची शेती केली असून त्यांच्या शेतातचार ते साडेचार फूट लांबीचे मासे आढळतात. माशाच्या शेतीसाठी ते खास प्रतीच्या बिया कोलकाताहून आणतात. चार ते साडेचार फूट लांबीच्या माशांची शेती : साठी या छोट्याश्या गावातील समहौता येथील रहिवासी आनंद सिंह हे चंपारणमधील पहिले आणि एकमेव शेतकरी आहेत, ज्यांनी मखाना, 7 इंच लांब कोळंबी आणि मानवी आकाराइतक्या भल्यामोठ्या माशांची शेती केली आहे. आनंद यांच्याकडे माशांच्या शेतीसाठी एकूण 6 तलाव असून या तलावांचा आकार अंदाजे 1 एकर इतका आहे. या तलावांमध्ये आनंद यांनी सुमारे 11 प्रकारच्या माशांची शेती केली आहे. यामध्ये रेहू, कतला, मृगल, मांगूर, ग्रास कार्प, सिल्व्हर कार्प, कॉमन कार्प आणि चितल या 4 ते 4.5 फूट आकाराच्या मांसाहारी माशांचा समावेश आहे. मत्स्यपालक आनंद यांनी सांगितले की, साधारणपणे चितलाचा आकार लहान असतो, पण जर तुम्ही तो 2 वर्ष तलावात सोडला तर त्याचा आकार 5 फुटांपर्यंत होऊ शकतो. आतापर्यंत त्यांनी 4 ते 4.5 फूट लांबीपर्यंत चितल मासळीची शेती केली आहे. ज्याचे वजन 20 किलो असून त्याची किंमत 400 ते 500 रुपये किलो आहे. मासेमारी करून वर्षाला 16 ते 17 लाखांची कमाई होते : आनंद यांनी सांगितले की, ते 4 किंवा 5 महिन्यानंतर सर्व माशांची हार्वेस्टिंग केली. या दरम्यान सर्व माशांचे वजन सुमारे 3 ते 4 किलो असते. केवळ मासेमारी करून ते दरवर्षी 16 ते 17 लाख रुपये कमावतात.