मुंबई, 5 मे- संजय दत्तचं आयुष्य म्हणजे कोणत्याही सिनेमापेक्षा कमी नाही. फार क्वचित कलाकार असतील ज्यांनी त्यांच्या आयुष्यात एवढे चढ- उतार पाहिले असतील. संजयची तीन लग्न झाली. पहिल्या बायकोच्या मृत्यू नंतर संजयने दुसरं लग्न केलं. पण दुसरं लग्न फार काळ टिकलं नाही. त्यानंतर संजयच्या आयुष्यात मान्यता आली. मान्यता आल्यानंतर त्याचं आयुष्य रुळावर यायला लागलं. मान्यतावर संजयचं अतोनात प्रेम आहे. मान्यताविरुद्ध कोणीही बोललेलं त्याला सहन होत नाही. याचंच उदाहरण द्यायचं म्हटलं तर मान्यतासाठी संजय आपल्या सख्या बहिणीसोबत प्रिया दत्त यांच्यासोबत भांडला होता. प्रिया यांना संजय आणि मान्यताचं लग्न मान्य नव्हतं. याचमुळे त्यांना रागाच्या भरात संजयला म्हटलं होतं की या बाईने माझ्या भावाला फसवलं आहे. प्रियाचं हे बोलणं ऐकून संजय फार भडकला होता. हनीमूनला पॅरिसला जातो सांगून शाहरुख या ठिकाणी घेऊन गेला गौरीला, स्वतः केला खुलासा २००९ मध्ये प्रिया यांनी सार्वजनिकपणे संजयची पत्नी मान्यताचा अपमान केला होता. प्रिया म्हणाली की, ‘ती त्याची बायको नाहीये. एवढंच काय तर ती सुनील आणि नरगिस दत्त यांची सूनही नाहीये. ती एक अशी बाई आहे जिने माझ्या भावाला फसवलं आहे.’ प्रियाचं सार्वजनिक ठिकाणचं हे वक्तव्य ऐकून संजय फार रागावला होता. या आजींबरोबरच्या फोटोमुळे मलायका झाली ट्रोल, युझर्स म्हणाले तुम्ही तर एकाच वयाच्या! टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत संजय म्हणाला होता की, ‘माझ्या पत्नीविरोधात बहिणीने असं काहीचं म्हटलं नव्हतं. घरातील मोठा सदस्य या नात्याने मी आणि मान्यताने तिला माफ केलं आहे. प्रिया आमच्यावर रागावली आहे. प्रिया आणि मी एका रक्ताचे आहोत आणि ही गोष्ट कोणीही बदलू शकत नाही. शिवाय मान्यता सुनील आणि नरगिस यांची सून आहे यातही काही वाद नाही.’ ‘आता सगळं लीगल आहे’, म्हणत या अभिनेत्रीने केलं दुसऱ्या अभिनेत्रीला प्रपोज प्रिया लग्नानंतरही दत्त आडनावच लावते. याबद्दल बोलताना संजय म्हणाला होता की, ‘जी मुलगी आता दुसऱ्या कुटुंबाची सदस्य आहे तिला त्या घरचं नाव आणि जबाबदाऱ्या स्वीकारल्या पाहिजेत. हा मेसेज फक्त माझ्या बहिणीसाठी नाही तर सगळ्याच मुलींसाठी आहे.’ VIDEO: ‘त्या’ बोल्ड दृश्याबद्दल प्रिया बापटनं अखेर मौन सोडलं