मुंबई, २८ एप्रिल- बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाची बायको ताहिरा कश्यपने गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात तिला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याची माहिती तिनेच सोशल मीडियावर दिली होती. यासोबतच उपचारादरम्यानही ती तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करून उपचार कसे सुरू आहेत त्याबद्दलही सांगायची. तिच्या या प्रवासात नवरा आयुष्माननेही तिला खंबीर साथ दिली. आयुष्माननेही तिच्या या सकारात्मक विचारांचं कौतुक केलं. आता पुन्हा एकदा तिने काही फोटो शेअर केले. यात तिने उपचारांदरम्यान तिचे केस कसे गळत गेले आणि अखेर तिला सगळे केस गमवावे लागले याची एक भावुक करणारी पोस्ट लिहिली आहे. या फोटोंमध्ये स्पष्ट दिसतं की केमोथेरपीमुळे ताहिराचे केस हळू हळू जायला लागले होते. करण-कजोलला मिळालं ‘बेबीसीटिंग’चं काम, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोंना कॅप्शन देताना तिने लिहिले की, ‘पुढचे फोटो पाहण्याआधीच सांगते की काही फोटो तुम्हाला आवडत नाहीत. पण मला अपेक्षा आहे की ते फोटो पाहून तुमचे विचार बदलतील. हे फोटो त्या सर्व महिलांसाठी आहेत ज्यांना केमोथेरपीच्या उपचारांदरम्यान स्वतःचे केस गमवावे लागले होते.’ Photos- बॉलिवूडच्या लव्हबर्ड्सनेही पाहिला ‘एवेंजर्स एंडगेम’
ताहिराने ज्या पद्धतीने कर्करोगाच्या उपचारांचा सामना केला यानंतर सर्व स्तरातून तिचं कौतुक केलं जात आहे. याआधीही ताहिराने कर्करोग दिनाच्या दिवशी तिचे फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये तिचा बोल्ड लुक दिसला होता. कर्करोगाशी निगडीत तिचे सर्व फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. एवढंच नाही तर ती आपल्या पोस्टमधून कर्करोगाचं निदान कसं करावं आणि वेळीच उपचार कसे घ्यावे याबद्दलही लोकांना जागरुक करताना दिसते. यूपीच्या या सेलिब्रिटींचीच चालते बॉलिवूडवर सत्ता
‘कदाचित देवाला… ’ श्रुती हसनच्या बॉयफ्रेंडने भावुक पोस्ट लिहित तोडलं नातं ताहिरा आणि आयुष्मान हे एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. कॉलेजमधलं प्रेम उत्तरोत्तर बहरत गेलं आणि त्यांनी २००८ मध्ये लग्न केलं. दोघांना विराजवीर आणि विरुष्का ही दोन मुलं आहेत. आयुष्मानच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर लवकरच तो ड्रिम गर्लमध्ये दिसणार आहे. राज शांडिल्य दिग्दर्शित या नुसरत भरूचाचीही महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा आहे.