JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / उर्मिला मातोंडकरचं नाव आमच्याकडं चर्चेत नसल्याचं सांगत शिवसेना नेत्यानं टाकला पडदा

उर्मिला मातोंडकरचं नाव आमच्याकडं चर्चेत नसल्याचं सांगत शिवसेना नेत्यानं टाकला पडदा

अभिनेत्री उर्मिला मातोंकरचं नाव आमच्याकडे चर्चेत नाही. याबाबत केवळ मीडिया चर्चा आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 ऑक्टोबर: अभिनेत्री उर्मिला मातोंकरचं नाव आमच्याकडे चर्चेत नाही. याबाबत केवळ मीडिया चर्चा आहे, असं सांगून शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी या मुद्द्यावर पडदा टाकला. चव्हाट्यावर बसून चर्चा करायची ही नावे नाहीत. राज्य सरकार काळजीपूर्वक नाव देत आहे. कॅबिनेटनं यासंदर्भात ठराव केला आहे. स्थगिती देण्याचा अधिकार कुणाला आहे, असं वाटत नाही. राज्यपालांकडे प्रस्ताव पाठवू, त्यानंतर काय होतंय ते पाहू, असंही अनिल परब यांनी यावेळी स्पष्ट केलं. हेही वाचा.. अनिल परब यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्यावर खोचक टीका केली. किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर 12 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप केला आहे. मात्र, किरीट सोमय्या यांचं एकच काम आहे, आरोप करायचं. भाजपही त्यांना गंभीरपणे घेत नाही, असा टोला अनिल परब यांनी यावेळी लगावला. भाजपनं सध्या कशावरच राजकारण करू नये, असा सल्लाही अनिल परब यांनी दिला. मुंबईत लोकल सुरू करण्यासंदर्भात केंद्र काय निर्णय घेते, ते पाहू. निदर्शने करण्याचा अधिकार आहे. त्यातून धार्मिक तेढ निर्माण होवू नये. मुंबई पोलीस याबाबतीत निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया अनिल परब यांनी मुंबईत भेंडी बाजारात रझा अकादमीनं केलेल्या आंदोलना संदर्भात दिली. कोरोनामध्ये एसटी उत्पन्न बुडालं… कोरोनामध्ये एसटी उत्पन्न बुडाले आहे. एसटी महामंडळ तोट्यात आहे. एसटी सुरू ठेवणं सरकारचे कर्तव्य आहे. कामगारांचेही पगार झालेले नाहीत. त्यांचे पगार, एसटी सुरू ठेवण्याचा किमान खर्च यासाठी सरकारकडे 3600 कोटी मागितले आहेत. तसंच बाहेरून पैसे उभे करण्याचा प्रयत्न सुरू आहेत. गेल्या 3 महिन्यांचे पगार थकले आहेत. 900 कोटी रूपये पगारासाठी आवश्यक आहेत. एसटीला एकूण साडेपाच हजार कोटींचा तोटा झाला आहे. हेही वाचा… कोरोना काळात अधिक तोटा झाला. मालमत्ता तारण ठेवून नाही तर मालवाहतुकीसाठी गाड्या वापरण्याचा निर्णय घेतला आहे. टायर रिमोल्ड किंवा बॉडी बिल्डींग ( गाड्या बांधणे) या फक्त एसटीसाठी करत आलो, आता आम्ही बाहेरचे कामही घेवू, असं अनिल परब यांनी यावेळी स्पष्ट केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या