JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / माणुसकीला काळिमा, 65 वर्षाच्या नराधमाचं 2 वर्षांच्या चिमुकलीसोबत संतापजनक कृत्य, श्रीरामपूर हादरलं

माणुसकीला काळिमा, 65 वर्षाच्या नराधमाचं 2 वर्षांच्या चिमुकलीसोबत संतापजनक कृत्य, श्रीरामपूर हादरलं

श्रीरामपूर तालुक्यातील एका धक्कादायक प्रकाराने मोठी खळबळ उडाली आहे.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

श्रीरामपूर, 20 फेब्रुवारी : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. अत्याचाराच्या घटनांमध्येही प्रचंड वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहेत. 65 वर्षीय नराधम मुख्याध्यापकाने 14 वर्षीय मुलीवर केले वारंवार अत्याचार केल्याची घटना मुंबईतून नुकतीच समोर आली. ही घटना ताजी असतानाच आता श्रीरामपूर येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 65 वर्षाच्या नराधमाने 2 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार केला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावातील या धक्कादायक प्रकाराने मोठी खळबळ उडाली आहे. श्रीरामपूर पोलिसांनी या 65 वर्षांच्या नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत. मानवतेला काळीमा फासणारी घटना ही श्रीरामपूर तालुक्यात घडली आहे. नातीबरोबर खेळण्यासाठी आलेल्या शेजारच्या नातीबरोबर 65 वर्षीय नराधम आजोबाने बलात्कार केला. भास्कर मोरे वय - 65 असे आरोपी नराधमाचे नाव आहे. पीडित मुलीच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादंवि कलम 376 बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण, पोस्को कायदा कलम 4, 8, 12प्रमाणे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुरेखा देवरे यांच्याकडून पुढील तपास सुरू आहे. हेही वाचा -  8 वर्षांचे प्रेम, पतीला घेऊन तरुणी थेट पोलीस ठाण्यात, प्रकरण समजल्यानंतर पोलिसांनाही धक्का

65 वर्षीय नराधम मुख्याध्यापकाने 14 वर्षीय मुलीवर केले वारंवार अत्याचार -

मुंबईत एक शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका प्रतिष्ठीत शाळेतील मुख्याध्यापकाने 14 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. होस्टेलवर राहणाऱ्या 14 वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकाला अटक करण्यात आली. दरम्यान आरोपीचे वय 65 असल्याने नातीच्या वयाच्या मुलीवर अत्याचार केल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या