JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / सेनेचे आणखी नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात -अजित पवार

सेनेचे आणखी नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात -अजित पवार

17 मार्च : शिवसेनेचे अजून काही नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात आहे त्यांची नावं जर सांगितली तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची झोप उडेल असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलाय. शिवसेनेचा आज आणखी नेता राष्ट्रवादीच्या गळाला लागला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत नार्वेकरांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी अजित पवारांनी सेनेला आणखी एक भगदाड पाडणार असे संकेत दिले आहे. कल्याणचे सेनेचे खासदार आनंद परांजपे, परभणीचे खासदार गणेश दुधगावकर आणि त्यानंतर आता शिवसेनेचे प्रवक्ते राहुल नार्वेकर यांनी शिवबंधनाचा धागा तोडून राष्ट्रवादीत प्रवेश केलाय.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

Image udhav_on_ajit5_300x255.jpg 17 मार्च : शिवसेनेचे अजून काही नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात आहे त्यांची नावं जर सांगितली तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची झोप उडेल असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलाय. शिवसेनेचा आज आणखी नेता राष्ट्रवादीच्या गळाला लागला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत नार्वेकरांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी अजित पवारांनी सेनेला आणखी एक भगदाड पाडणार असे संकेत दिले आहे.

कल्याणचे सेनेचे खासदार आनंद परांजपे, परभणीचे खासदार गणेश दुधगावकर आणि त्यानंतर आता शिवसेनेचे प्रवक्ते राहुल नार्वेकर यांनी शिवबंधनाचा धागा तोडून राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. तर शिर्डीत सेनेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. निवडणुकीच्या रणधुमाळीत फोडाफोडीच्या राजकारणाला सुरूवात झालीय.

आज (सोमवारी) शिवसेना धक्का देत राष्ट्रवादीने आणखी नेता आपल्या गोटात खेचून आणलाय. शिवसेनेचे प्रवक्ते राहुल नार्वेकर यांनी अखेर शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. त्यांना मावळमधून उमेदवारी देण्यात आली. पक्षांतर्गत राजकारणामुळे आपण शिवसेना सोडल्याचं नार्वेकर यांनी सांगितलंय. पक्षात घुसमट होत होती, विधान परिषदत निवडणुकीत आपल्याला शिवसेनेत कुणीच मदत केली नाही. पद नसलेले लोक पाय खेचण्याचं काम करत होते, असं म्हणत नार्वेकरांनी नाव न घेता मिलिंद नार्वेकर यांच्यावर तोफ डागली. हा सर्व प्रकार पक्ष नेतृत्वाच्या कानावर घालूनही काहीच फायदा झाला नसल्याचंही ते म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादी लवकरच सेनेला आणखी एक मोठा धक्का देण्याचे संकेत अजित पवार यांनी दिले आहे. शिवसेनेचे आणखी काही नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत आणि त्यांची नावं सांगितली तर उद्धव ठाकरेंची झोप उडेल, असा टोला अजित पवार यांनी लगावलाय. नार्वेकर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर “राहुल नार्वेकर घेणार मावळ लोकसभेत जिवंत समाधी " अशी जळजळीत प्रतिक्रिया सेनेनं ट्विटरवर दिली. राष्ट्रवादीच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे निवडणुकीचे वातावरण आणखी तापलंय त्यामुळे आता सेनेचे कोणते नेते राष्ट्रवादीच्या वाटेवर आहे याची चर्चा आता सुरू झालीय.

संबंधित बातम्या

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या