JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / संसदेची दोन्ही सभागृहे पुढील अधिवेशनापर्यंत स्थगित

संसदेची दोन्ही सभागृहे पुढील अधिवेशनापर्यंत स्थगित

18 डिसेंबर : संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज बुधवारी पुढील अधिवेशनापर्यंत स्थगित करण्यात आले आहे. लोकपाल विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर लोकसभेचे कामकाज तात्काळ थांबवण्यात आले. तर भारत-बांगलादेश सीमाप्रश्नाबाबत विधेयक मांडल्यानंतर प्रचंड गदारोळ झाल्यामुळे राज्यसभेचे कामकाज थांबवण्यात आले. संबंधित बातम्या {{display_headline}} लोकसभेत आणि राज्यसभेतही अनेक महत्त्वाची विधेयकं चर्चेसाठी येणे अपेक्षित होते. यामध्ये जातीय हिंसाचारविरोधी विधेयक, विमा खात्यातील सुधारणांचे विधेयक, महिला आरक्षणाचे विधेयक अशी अनेक बिलं मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. पण, त्याआधीच संसद पुढील अधिवेशनापर्यंत स्थगित करण्यात आली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

Image img_99922_sansad_240x180.jpg 18 डिसेंबर :  संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज बुधवारी पुढील अधिवेशनापर्यंत स्थगित करण्यात आले आहे. लोकपाल विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर लोकसभेचे कामकाज तात्काळ थांबवण्यात आले. तर भारत-बांगलादेश सीमाप्रश्नाबाबत विधेयक मांडल्यानंतर प्रचंड गदारोळ झाल्यामुळे राज्यसभेचे कामकाज थांबवण्यात आले.

संबंधित बातम्या

लोकसभेत आणि राज्यसभेतही अनेक महत्त्वाची विधेयकं चर्चेसाठी येणे अपेक्षित होते. यामध्ये जातीय हिंसाचारविरोधी विधेयक, विमा खात्यातील सुधारणांचे विधेयक, महिला आरक्षणाचे विधेयक अशी अनेक बिलं मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. पण, त्याआधीच संसद पुढील अधिवेशनापर्यंत स्थगित करण्यात आली. पंधराव्या लोकसभेचे हे एका अर्थाने शेवटचे पूर्ण अधिवेशन ठरण्याची शक्यता आहे. कारण यापुढचे अधिवेशन जेव्हा असेल तेव्हा कदाचित लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागलेली असेल आणि त्यामुळे त्या अधिवेशनात देशाचे अंतरिम बजेट पास करून घेण्यापलीकडे काहीच होणार नाही. यामुळेच या अधिवेशनाचे कामकाज वाढवावे, अशी अपेक्षा होती. पण ती फोल ठरली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या