JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / श्रद्धेने मंदिरात जावं, हट्टापायी नको- पंकजा मुंडे

श्रद्धेने मंदिरात जावं, हट्टापायी नको- पंकजा मुंडे

पुणे - 01 फेब्रुवारी : महिलांनी श्रद्धेने मंदिरात जावं, हक्काने नाही. शनिशिंगणापूर इथल्या मंदिरात हट्टाने जाणार्‍या महिलांनी समाजातील शांतता भंग करू नये, असं वादग्रस्त वक्तव्य महिला आणि बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना केलं. संबंधित बातम्या {{display_headline}} शनीदर्शनाचा हक्क मिळावा यासाठी 26 जानेवारीला भूमाता ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्यांनी मैदान गाजवलं. त्यांना काही शनीदेवाचं दर्शन घेता आलं नाही. मात्र या प्रकरणाचे देशभरात पडसाद उमटले. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केल्यानंतर विश्वस्तांनी सारवासारव केली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा
shanishingnapur and pankaja new12

पुणे - 01 फेब्रुवारी : महिलांनी श्रद्धेने मंदिरात जावं, हक्काने नाही. शनिशिंगणापूर इथल्या मंदिरात हट्टाने जाणार्‍या महिलांनी समाजातील शांतता भंग करू नये, असं वादग्रस्त वक्तव्य महिला आणि बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना केलं.

संबंधित बातम्या

शनीदर्शनाचा हक्क मिळावा यासाठी 26 जानेवारीला भूमाता ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्यांनी मैदान गाजवलं. त्यांना काही शनीदेवाचं दर्शन घेता आलं नाही. मात्र या प्रकरणाचे देशभरात पडसाद उमटले. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केल्यानंतर विश्वस्तांनी सारवासारव केली. त्यामुळे आता विश्वस्तांकडून लवकरच भूमाता ब्रिगेडला चर्चेचं निमंत्रण दिलं जाणार आहे. तर दुसरीकडे शिंगणापूरच्या शनिचौथर्‍यावर जाण्यावरून उद्भवलेल्या वादाबाबत पंकजा मुंडे यांना विचारले असता “मंदिरात दर्शन घेणं हा श्रद्धेचा भाग आहे. मंदिरात हट्टाने प्रवेश मिळवताना महिलांनी सामाजिक शांतता भंग करू नये. आतापर्यंत जातीभेदाची लढाई लढलो आता ही स्त्री-पुरुष भेदाची लढाई कशासाठी?”, असं मत त्यांनी व्यक्त केलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv


मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या