JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / मुंबई गँगरेप :घटनास्थळी आरोपींचा 'कबुली'नामा

मुंबई गँगरेप :घटनास्थळी आरोपींचा 'कबुली'नामा

28 ऑगस्ट : मुंबईत छायाचित्रकार तरूणीवर सामूहिक बलात्कार प्रकरणातल्या पाचही आरोपींना आज क्राईम ब्रांचनं ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या शक्ती मिल कम्पाऊंडमध्ये नेलं. जॉइंट कमिशनर हिमांशू रॉय यांनी क्राईम ब्रांचच्या टीमचं नेतृत्त्व केलं. गुन्हा कसा घडला याची माहिती पोलिसांनी आरोपींकडून जाणून घेतली. आरोपींनी दिलेल्या जबाबातली तफावत दूर करण्यासाठी तसंच बळकट खटला तयार करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. फॉरेन्सिक टीमनं काल शक्ती मिल कम्पाऊंडमधून पुरावे जमा केले होते. तसंच पाचही आरोपींचे डीएनए सॅम्पल्स घेतले होते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

shakti mill 28 ऑगस्ट : मुंबईत छायाचित्रकार तरूणीवर सामूहिक बलात्कार प्रकरणातल्या पाचही आरोपींना आज क्राईम ब्रांचनं ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या शक्ती मिल कम्पाऊंडमध्ये नेलं. जॉइंट कमिशनर हिमांशू रॉय यांनी क्राईम ब्रांचच्या टीमचं नेतृत्त्व केलं.

गुन्हा कसा घडला याची माहिती पोलिसांनी आरोपींकडून जाणून घेतली. आरोपींनी दिलेल्या जबाबातली तफावत दूर करण्यासाठी तसंच बळकट खटला तयार करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.

फॉरेन्सिक टीमनं काल शक्ती मिल कम्पाऊंडमधून पुरावे जमा केले होते. तसंच पाचही आरोपींचे डीएनए सॅम्पल्स घेतले होते. मागिल आठवड्यात 22 ऑगस्ट रोजी या पाचही नराधमांनी छायाचित्रकार तरूणीवर अत्याचार केला होता. पीडित तरूणी ही एका मासिकात छायाचित्रकार आहे. एका असाईंमेंटसाठी ही तरूणी आपल्या सहकार्‍यासोबत महालक्ष्मी येथील शक्ती मिलमध्ये गेली होती.

संबंधित बातम्या

त्यावेळी या पाचही नराधमांनी तिच्या सहकार्‍याला बेदम मारहाण करून तिच्यावर बलात्कार केला होता. या प्रकरणी पोलिसांनी दोनच दिवसात पाचही आरोपींच्या मुसक्या आवळ्यात. पाचही आरोपींनी गुन्हा कबूल केलाय. या प्रकरणी आरोपपत्र महिन्याभरात दाखल करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. यासाठी आज सर्व आरोपींना शक्ती मिलमध्ये नेऊन घडलेल्या घटनेचा जबाब नोंदवला गेलाय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या