JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / मुंडेंनी बारामतीत उभं राहून दाखवावं -अजित पवार

मुंडेंनी बारामतीत उभं राहून दाखवावं -अजित पवार

08 जानेवारी : गोपीनाथ मुंडेंना जर उद्या बारामतीत येऊन उभं राहून दाखवाच असं म्हटलं तर चालेला का ? असा टोला उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी गोपीनाथ मुंडेंना लगावला. तसंच मला पक्ष जो आदेश देईल तो मला मान्य असेल. त्यामुळे मला इथं येऊन दाखवा तिथं येऊन दाखवण्याची गरज नाही असंही अजित पवार म्हणाले. पवारांनी बीडमधून निवडणूक लढवावी, असं आव्हान गोपीनाथ मुंडेंनी दिलं होतं. यावर अजित पवारांनी गोपीनाथ मुंडेंना उत्तर दिलंय.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

dada on munde 08 जानेवारी : गोपीनाथ मुंडेंना जर उद्या बारामतीत येऊन उभं राहून दाखवाच असं म्हटलं तर चालेला का ? असा टोला उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी गोपीनाथ मुंडेंना लगावला. तसंच मला पक्ष जो आदेश देईल तो मला मान्य असेल. त्यामुळे मला इथं येऊन दाखवा तिथं येऊन दाखवण्याची गरज नाही असंही अजित पवार म्हणाले. पवारांनी बीडमधून निवडणूक लढवावी, असं आव्हान गोपीनाथ मुंडेंनी दिलं होतं. यावर अजित पवारांनी गोपीनाथ मुंडेंना उत्तर दिलंय.

काही दिवसांपुर्वी अजित पवार यांनी बीडमध्ये राष्ट्रवादीतून कुणाला उमेदवारी द्यायची यावरुन थेट गोपीनाथ मुंडे यांच्यावर निशाणा साधला होता. बीडमध्ये राष्ट्रवादीला तगडा उमेदवार हवाय. कुणी नाही मिळाला, तर मीच उभा राहीन, असं अजित पवार म्हणाले होते. आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी बुधवारी भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांची खास मुलाखत घेतली त्यावेळी त्यांनी अजित पवारांचं आव्हान जाहीरपणे स्वीकारत बीडमध्ये निवडणूक लढवण्याचं आमंत्रण दिलं.

बीडमध्ये माझ्या विरोधात अजित पवारांना तगडा उमेदवार सापडला नाही. माझ्या दृष्टीने खरा तगडा उमेदवार अजित पवार हेच आहे. त्यांनी बीडमधून निवडणुकीसाठी उभे राहावे मी त्यांचं स्वागत करतो. होऊन जाऊ द्या एकदा असं सांगत मुंडे यांनी अजित पवार यांचं आव्हान स्विकारलं होतं. मुंडेंच्या आव्हानाला अजित पवारांनी आपल्या शैलीत उत्तर दिलं. गोपीनाथ मुंडेंना जर उद्या बारामतीत येऊन उभं राहुन दाखवाच असं म्हटलं तर चालेला का ? असा टोला पवारांनी मुंडेंना लगावला. तसंच मला पक्ष जो आदेश देईल तो मला मान्य असेल. त्यामुळे मला इथं येऊन दाखवा तिथं येऊन दाखवण्याची गरज नाही असंही अजित पवार म्हणाले. तसंच त्यांनी स्वाभिमानीने महायुतीसोबत हातमिळवणी केली तर त्यामुळे आम्हाला धडकी भरणार नाही, असंही ते म्हणाले. मराठा समाजाबरोबरच मुस्लिम समुदायालाही आरक्षण देण्याचा सरकारचा विचार आहे, अशी माहितीही पवारांनी दिली.

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या