****
03 मार्च : लोकसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत पण जर आज राज्यात लोकसभेच्या निवडणुका झाल्यात कोण बाजी मारणार यासाठी आयबीएन-नेटवर्क आणि लोकनीती-सीएसडीसीने सर्व्हे केलाय. या सर्व्हेनुसार महाराष्ट्रात जर आज निवडणुका झाल्यातर महायुती बाजी मारेल असं चित्र आहे. एकूण 48 जागांपैकी महायुतीला 23 ते 29 जागा मिळतील असा कौल जनतेनं दिलाय.
तर सत्ताधारी आघाडी सरकारला 16 ते 22 जागा मिळतील. आणि इतर पक्षांना 1 ते 5 जागा मिळतील. मतांची टक्केवारी पाहिली तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीला 36 टक्के इतकी मतं पडतील. तर महायुतीची टक्केवारी 42 टक्के इतकी आहे. पहिल्यांदाच महाराष्ट्रात लढणार्या आम आदमी पार्टीची टक्केवारी 5 टक्के इतकी आहे. याखालोखाल राज ठाकरे यांच्या मनसेची टक्केवारी 4 टक्के इतकी आहे. इतर पक्षांची टक्केवारी 9 टक्के इतकी आहे.
पक्षनिहाय मतांची टक्केवारी पाहिली तर नरेंद्र मोदींचा इफेक्ट राज्यातही दिसून येत आहे. राज्यात भाजपची मतांची टक्केवारी 29 टक्के इतकी आहे. तर शिवसेनेची 11 टक्के आहे. देशभरात काँग्रेस विरुद्ध चित्र जरी असले तरी राज्यात काँग्रेसची मतांची टक्केवारी 28 टक्के इतकी आहे. तर आघाडीचा मित्र पक्ष राष्ट्रवादीची टक्केवारी फक्त 8 टक्के आहे. मनसेची टक्केवारी 4 इतकी आहे आणि आपची टक्केवारी 5 टक्के कायम आहे. राज्यात आघाडी सरकारच्या कामगिरीबद्दल 45 टक्के लोकं समाधानी आहे तर 50 टक्के लोकं असमाधानी आहे. यावरून यूपीए सरकारच्या कामगिरी बाबत विचारणा केली असता 56 टक्के लोकांनी समाधान व्यक्त केलं तर 58 टक्के लोकांनी असमाधान व्यक्त केलंय.
‘राष्ट्रवादी - भाजप आघाडी नको’ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चेला उधाण आले होते. यामुळे राष्ट्रवादीने लोकसभा निवडणूक भाजपसोबत लढवावी का ? असा प्रश्न विचारला असता 16 टक्के लोकांनी होकार दिलाय तर 50 टक्के लोकांनी नकार दिलाय. तर 34 टक्के लोकांना याबाबत माहितच नाही. एकंदरीतच ‘तुझं माझं जमेना..’ असं मान्य करून आघाडीला लोकसभेला सामोरं जावं लागणार आहे. ‘मनसेला युती गरजेची’ महाराष्ट्रात शिवसेनेनंतर मराठी मतांसाठी हक्काचा पक्ष मानला जातो महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात राज ठाकरे यांचा मनसे. राजकारणात एकमेकांच्या खुर्चीला खुर्ची लाऊन सत्तेवर विराजमान होता येतं हे सिद्ध झालंय. पण राज ठाकरे त्याला अपवाद आहे. राज यांनी ‘एकला चलो रे’ची भूमिका घेऊन कुणासोबतही युती करणार नाही असं स्पष्ट केलंय. याबाबतच मनसेनं लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवावी की आघाडीत ? असा सवाल विचारला असता 39 टक्के लोकांनी स्वबळावर लढावं असं मत नोंदवलंय तर 24 टक्के लोकांनी आघाडीसोबत जावं असं वाटतंय. तर 38 टक्के लोकांना माहितच नाही.तसंच महायुतीसोबत युती करावी असं 59 टक्के जनतेला वाटतंय तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत युती करावी असं 11 टक्के लोकांना वाटतंय. मोदींना पंतप्रधानपदासाठी पसंती राज्यातल्या या सर्व्हेवरुन देशाचा पंतप्रधान कोणं व्हावा असं विचारला असता महाराष्ट्राच्या 31 टक्के जनतेनं भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी पसंती दिलीय. तर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना 16 टक्के लोकांनी पसंती दिलीय. तर आपचे नेते अरविंद केजरीवाल यांना 4 टक्के लोकांनी पसंती दिलीय. आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना 4 टक्के लोकांनीच पसंती दिलीय. त्यामुळे देशासह राज्याच्या जनतेनंही मोदींच्या पारड्यात आपलं मत टाकलंयय अपेक्षित मतांची टक्केवारी -————————————————————————–-————————————— पक्ष 2009 जुलै 2013 जाने. 2014 फेब्रु. 2014 -————————————————————————–-————————————— काँग्रेस+राष्ट्रवादी 39% 43% 35% 36% महायुती 35% 36% 44% 42% AAP — —- 5% 5% बसपा 5% 8% 4% 4% मनसे 4% 5% 2% 4% इतर 17% 8% 10% 9% -————————————————————————–-————————————— -————————————————————————–-————————————— पक्षनिहाय मतांची टक्केवारी -————————————————————————–-————————————— पक्ष 2009 जुलै 2013 जाने. 2014 फेब्रु. 2014 -—————————————————————-—————————————————- भाजप 18% 27% 36% 29% शिवसेना 17% 8% 6% 11% RPI(A) 1% 1% 2% 2% काँग्रेस 20% 37% 29% 28% राष्ट्रवादी 19% 6% 6% 8% AAP — —- 5% 5% बसपा 5% 8% 4% 4% मनसे 4% 5% 2% 4% इतर 16% 8% 10% 9% -—————————————————————-————————————————– -————————————————————————–-————————————— मतदान करताना कशाला प्राधान्य द्याल ? -————————————————————————–-————————————— जाने. 2014 फेब्रु. 2014 -————————————————————————–-————————————— स्थानिक उमेदवार - 32% 43% पक्ष - 35% 35% पक्षाचा पंतप्रधानपदाचा उमेदवार - 17% 12% इतर मुद्दे - 6% 3% माहीत नाही - 10% 7% -————————————————————————–-————————————— -————————————————————————–-————————————— राष्ट्रवादीने लोकसभा निवडणूक भाजपसोबत लढवावी का ? -————————————————————————–-————————————— हो - 16% नाही - 50% माहीत नाही - 34% -————————————————————————–-————————————— मनसेनं लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवावी की आघाडीत ? -————————————————————————–-————————————— जाने.14 फेब्रु. 14 ****-————————————————————————–-——————————-
स्वबळावर - 33% 39% आघाडीत जावं - 28% 24% माहीत नाही - 39% 38% -————————————————————————–-————————————— -————————————————————————–-————————————— मनसेनं कुणासोबत आघाडी करावी ? -————————————————————————–-————————————— जाने.14 फेब्रु.14 महायुती - 51% 59% काँग्रेस+राष्ट्रवादी - 8% 11% दोघांशी - 4% 4% भाजप, पण शिवसेनेशिवाय - 9% 8% शिवसेना, पण भाजपशिवाय - 11% 7% सेना-भाजप, RPIशिवाय - 6% 3% काँग्रेस, पण राष्ट्रवादीशिवाय - 1% 1% राष्ट्रवादी, पण काँग्रेसशिवाय - 1% 1% माहीत नाही - 9% 6%
-————————————————————————–-—————————————
मनसेच्या टोल आंदोलनाविषयी ऐकलं आहे का ? हो - 66% नाही - 34% -————————————————————————–-————————————— : मनसेच्या टोल आंदोलनावर तुमचं मत काय ? कारण आणि आंदोलनाची पद्धत योग्य - 35% कारण आणि आंदोलनाची पद्धत अयोग्य - 35% आंदोलनाचं कारण चुकीचं - 8% माहीत नाही - 22% -————————————————————————–-————————————— महाराष्ट्र सरकारच्या कामगिरीवर तुम्ही समाधानी आहात ? -————————————————————————–-————————————— जुलै.13 जाने.14 फेब्रु.14
-————————————————————————–-————————————— समाधानकारक - 64% 38% 45% असमाधानकारक - 29% 48% 50% -————————————————————————–-————————————— यूपीए सरकारच्या कामगिरीवर तुम्ही समाधानी आहात ? -————————————————————————–-————————————— जुलै.13 जाने.14 फेब्रु.14 हो - 47% 34% 47% नाही - 40% 53% 48% माहीत नाही - 13% 13% 5% -————————————————————————–-————————————— यूपीए सरकारला पुन्हा संधी द्यावी का ? -————————————————————————–-————————————— जुलै. 13 जाने.14 फेब्रु.14 हो - 39% 25% 25% नाही - 45% 59% 57% माहीत नाही - 16% 16% 18% -————————————————————————–-—————————————
जागांचा अंदाज - एकूण जागा - 48 काँग्रेस + राष्ट्रवादी - 16 -22 शिवसेना + भाजप - 23 - 29 इतर - 1- 5 -————————————————————————–-————————————— असा केला सर्व्हे * सर्व्हेचा कालावधी - 17 ते 23 फेब्रुवारी 2014 * मतदारसंघांची संख्या - 30 * मतदान केंद्रांची संख्या - 90 * अपेक्षित मतदारांचा सहभाग - 1800 * प्रत्यक्ष मतदारांचा सहभाग - 1456