09 जुलै : बोधगया इथं महाबोधी मंदिरात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचा तपास वेगात सुरू असून त्यात नक्षलवाद्यांचा हात आहे का? याचाही तपास करण्यात येत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितलं. शिंदे आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज बोधगया मंदिराला भेट देवून पाहणी केली. देशभरातल्या सर्वच धार्मिक स्थळांची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आल्याचंही ते म्हणाले.दरम्यान, आतापर्यंत चार संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय. एनआयएनं तपासाची सूत्रं हाती घेतली. मात्र, स्फोटाच्या मॉड्युलबद्दल अजूनही काही सांगता येत नाही, असं एनआयएच्या सूत्रांनी सांगितलं. म्यानमारमधल्या मुस्लिम-बौद्ध संघर्षाची पार्श्वभूमी या स्फोटामागं आहे का हेही पडताळून पाहिलं जात आहे.