19 ऑक्टोबर : कोळसा घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधानांची पाठराखण केलीय. कोळसा घोटाळ्यासंबंधी मनमोहन सिंग यांचा आरोपींमध्ये समावेश करणे हे खोडसाळपणाचे आहे असं पवार म्हणालेत. पंतप्रधानांना जगात मान आहे. त्यांच्याविषयी बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे असंही ते पुढे म्हणाले. तसंच एमसीएच्या निवडणुकीवरून पवारांनी गोपीनाथ मुंडेंना टोला लगावला. एमसीएची निवडणूक व्हायला हवी होती. तसं झालं असतं तर चित्र स्पष्ट झालं असतं असं पवार म्हणाले. त्याचबरोबर सरकार स्वप्नातल्या सोन्याच्या मागे धाऊन बुवाबाजीला प्रोत्साहन देतंय असंही मतही पवारांनी मांडलय.