28 मार्च : ग्रामविकासमंत्री जयंत पाटील हे शकुनीमामा आहे. त्यांनी कल्लापा अण्णा आवाडे यांना भीष्माचार्यांप्रमाणे घायाळ होण्यासाठीच माझ्या विरोधात निवडणुकीच्या रणांगणात उतरवलंय, अशी टीका हातकणंगले मतदारसंघाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार खासदार राजू शेट्टी यांनी केलीय. सांगली जिल्ह्यातल्या ऐडेमच्छिंद्र या क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या गावातून शेट्टी यांनी आपला प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी राजू शेट्टी हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. स्वातंत्र्य संग्रामात क्रांतिसिंह नाना पाटील यांना गोर्या इंग्रजांच्या विरोधात लढा उभा करावा लागला होता. आता शेतकर्यांना आपल्याच काळ्या इंग्रजांविरोधात लढावं लागतंय, अस सांगून राजू शेट्टी पुढे म्हणाले, शरद पवारांविरोधात माझी निवडणूक आहे, असंही शेट्टी म्हणाले. . राजू शेट्टी यांच्या प्रचारसभेच्यावेळी वेगवेगळ्या गावातील लोकांनी अडीज लाखाची देणगी निवडणूकीसाठी शेट्टी यांना दिला.