JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / उद्धव म्हणाले,'आशीर्वाद आम्हाला मिळेल', तर राज म्हणतात, 'कोण जिंकत पाहायचं'

उद्धव म्हणाले,'आशीर्वाद आम्हाला मिळेल', तर राज म्हणतात, 'कोण जिंकत पाहायचं'

21 फेब्रुवारी : राज्यात दहा महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या मतदानाला सुरुवात झाली असून यासाठी मतदारांबरोबरच अनेक राजकीय नेतेमंडळी मतदानाचा हक्क बजावत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कुटुंबीयांसोबत आज सकाळी मतदानाचा हक्क बजावला. महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या मतदानाला आज सकाळपासूनच सुरुवात झाली. मतदानासाठी अनेक दिग्गज नेतेमंडळी मतदानाचा हक्क बजावत आहेत. उद्धव ठाकरे यांनी आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा
THACKRAY BANDHU

21 फेब्रुवारी :  राज्यात दहा महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या मतदानाला सुरुवात झाली असून यासाठी मतदारांबरोबरच अनेक राजकीय नेतेमंडळी मतदानाचा हक्क बजावत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. तर  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कुटुंबीयांसोबत आज सकाळी मतदानाचा हक्क बजावला.

महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या मतदानाला आज सकाळपासूनच सुरुवात झाली. मतदानासाठी अनेक दिग्गज नेतेमंडळी मतदानाचा हक्क बजावत आहेत. उद्धव ठाकरे यांनी आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला आहे. उद्धव ठाकरेंनी वांद्रे इथल्या कालनगर परिसरात मतदान केलं आहे, तर राज ठाकरेंनी शिवाजी पार्क परिसरातील बालमोहन विद्यामंदिर शाळेत त्यांनी मतदान केलं.

यावेळी माध्यामांशी बोलताना उद्धव ठाकरेंनी तमाम मतदारांचे आभार मानले आहे. तसंच, ज्या उत्साहाने मतदान होतंय, त्यावरून शिवसेनेला आशिर्वाद मिळाल्याशिवाय रहाणार नाही, असा आशीर्वादही त्यांनी व्यक्त केला आहे. तर राज ठाकरे यांनी मतदान केल्यानंतर काम जिंकतं का पैसा, ते पाहायचं आहे, अशी प्रतिक्रिया दिली.

संबंधित बातम्या


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv


मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या