JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / उत्तराखंड:17 दिवसांनंतर बचावकार्य संपलं

उत्तराखंड:17 दिवसांनंतर बचावकार्य संपलं

** 02 जुलै :**उत्तराखंडमध्ये महाप्रलयामुळे अडकलेल्या यात्रेकरूंना बाहेर काढण्याचे रेसक्यु मिशन अखेर 17 दिवसांनंतर संपलंय. बद्रीनाथमधल्या अडकलेल्या यात्रेकरूंचा शेवटचा गटाला आज बाहेर काढण्यात आलं. आजपासून स्थानिकांच्या पुनर्वसनाला सुरुवात झाली आहे. साथीचे आजार पसरू नये यासाठी मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार केले जात आहे. राज्याच्या प्रभावित भागांची पुनर्बांधणीही करण्याचं आव्हानही राज्य सरकारसमोर आहे. दरम्यान, बेपत्ता लोकांची संख्या 3000 आहे, 10 हजार नाही असं उत्तराखंडच्या मुख्यमंत्री बहुगुणा यांनी स्पष्ट केलंय. या महाप्रलयात 1000 लोकांचा मृत्यू झाला असा असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

** utrakhand today 2 july 02 जुलै :**उत्तराखंडमध्ये महाप्रलयामुळे अडकलेल्या यात्रेकरूंना बाहेर काढण्याचे रेसक्यु मिशन अखेर 17 दिवसांनंतर संपलंय. बद्रीनाथमधल्या अडकलेल्या यात्रेकरूंचा शेवटचा गटाला आज बाहेर काढण्यात आलं. आजपासून स्थानिकांच्या पुनर्वसनाला सुरुवात झाली आहे.

साथीचे आजार पसरू नये यासाठी मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार केले जात आहे. राज्याच्या प्रभावित भागांची पुनर्बांधणीही करण्याचं आव्हानही राज्य सरकारसमोर आहे. दरम्यान, बेपत्ता लोकांची संख्या 3000 आहे, 10 हजार नाही असं उत्तराखंडच्या मुख्यमंत्री बहुगुणा यांनी स्पष्ट केलंय. या महाप्रलयात 1000 लोकांचा मृत्यू झाला असा असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं. या संपूर्ण बचावकार्यत हवाई दलाच्या जवानांनी प्राणाची बाजी लावून हजारो यात्रेकरूंना सुखरूप बाहेर काढलं. तब्बल 75 हजार लोकांना वाचवण्याचं काम जवानांनी केलं.

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या