05 ऑगस्ट : मुंबई हाय कोर्टाच्या निर्णयाविरोधात आता बीसीसीआयने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बीसीसीआयच्या चौकशी समितीने चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ गुरुनाथ मय्यप्पन, राज कुंद्राला क्लीन चीट दिली होती. पण यावर मुंबई हाय कोर्टाने ताशेरे ओढले होते. ही समितीच अवैध असल्याचे मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं होतं. त्याविरोधात बीसीसीआय आता सुप्रीम कोर्टात गेलंय. मय्यप्पन आणि चेन्नई सुपर किंग्जला क्लिन चीट मिळाल्यानं एन श्रीनिवासन यांचा बोर्डात परतण्याचा मार्ग मोकळा झाला होता. पण मुंबई हाय कोर्टाच्या ताशेर्यांनंतर बोर्डाने महत्त्वपूर्ण बैठक रद्द केली होती. आता सुप्रीम कोर्टातून हिरवा कंदील मिळवण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न असेल.