JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / संजूबाबाचा मुक्काम पोस्ट जेलच, कोर्टाने याचिका फेटाळली

संजूबाबाचा मुक्काम पोस्ट जेलच, कोर्टाने याचिका फेटाळली

23 जुलै : 1993 बॉम्बस्फोट प्रकरणी अभिनेता संजय दत्तचा तुरुंगातून बाहेर येण्याचे सर्व मार्ग बंद झालेत. संजयने सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल केली होती. मात्र कोर्टाने त्याची याचिका साफ फेटाळून लावलीय. त्यामुळे संजय दत्तला पूर्ण शिक्षा भोगावी लागणार असून जेलच्या बाहेर येण्याचे सर्व कायदेशीर मार्ग बंद झाले आहेत. या अगोदरही त्याने फेरविचार याचिका दाखल केली होती तेंव्हाही कोर्टाने याचिका फेटाळून लावली होती. 1993 बॉम्बस्फोट प्रकरणात बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी अभिनेता संजय दत्तला 5 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आलीय.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

Image img_238682_sanjayduttinyervadajail_240x180.jpg 23 जुलै : 1993 बॉम्बस्फोट प्रकरणी अभिनेता संजय दत्तचा तुरुंगातून बाहेर येण्याचे सर्व मार्ग बंद झालेत. संजयने सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल केली होती. मात्र कोर्टाने त्याची याचिका साफ फेटाळून लावलीय. त्यामुळे संजय दत्तला पूर्ण शिक्षा भोगावी लागणार असून जेलच्या बाहेर येण्याचे सर्व कायदेशीर मार्ग बंद झाले आहेत. या अगोदरही त्याने फेरविचार याचिका दाखल केली होती तेंव्हाही कोर्टाने याचिका फेटाळून लावली होती.

1993 बॉम्बस्फोट प्रकरणात बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी अभिनेता संजय दत्तला 5 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आलीय. त्यापैकी त्याने अगोदर 18 महिन्याची शिक्षा भोगली आहे. एप्रिल 2013 मध्ये सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची अंतिम सुनावणी झाली. यात संजय 5 वर्षांची शिक्षा भोगावीच लागेल अशी शिक्षा सुनावण्यात आली होती.

अखेर त्याने 16 मे रोजी टाडा कोर्टात शरण आला. साडेतीन वर्षांसाठी तुरूंगवास भोगण्यासाठी जाणार्‍या संजय दत्तने घरचं जेवण, इलेक्ट्रॉनिक सिगारेट आणि औषध देण्याची विनंती केली. कोर्टाने त्यांची विनंती मान्य करत फक्त एक महिन्यासाठी मुदत दिली. त्यानंतर त्याला तुरुंगातलं जेवण जेवावं लागणार आहे. मात्र त्याला इलेक्ट्रॉनिक सिगारेट सोबत ठेवण्याची विनंती टाडा कोर्टाने अमान्य केली आहे. शरण आल्यानंतर त्याला काही दिवस मुंबईतील ऑर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात आलं. ऑर्थर रोड जेलचा पाहुणचार घेतल्यानंतर त्याची रवानगी पुण्यातील येरवडा तुरूंगात करण्यात आली.

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या