07 जुलै : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठा हादरा बसला आहे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित घोरपडे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. तासगाव-कवठे महाकाळ मतदारसंघातून आर.आर.पाटील यांच्या विरोधात आपली उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत आर.आर.पाटील विरुद्ध अजित घोरपडे अशी झुंज रंगणार आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अजित घोरपडे यांनी भाजपचे संजयकाका पाटील यांचा उघड प्रचार केला होता. त्यामुळे तासगाव-कवठे महाकाळ या मतदारसंघातून भाजपच्या संजयकाका पाटील यांना 38 हजारांचे मताधिक्य मिळाले होते. अजित घोरपडे यांची उमेदवारी ही आर.आर.पाटील आणि पर्यायाने राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरणार आहे हे नक्की. माजी मंत्री अजित घोरपडे यांचा परिचय :
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++