08 मार्च : दुष्काळ आणि अवेळी पावसाने नुकसानग्रस्त झालेल्या शेतकर्यांना मदत, कॉ. गोविंद पानसरे यांची हत्या, मुस्लीम आरक्षण, गोवंश हत्याबंदी, मुंबईचा विकास आराखडा यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर येत्या सोमवारपासून सुरू होणार्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सत्ताधारी भाजपची कसोटी लागणार आहे. या अधिवेशनादरम्यान 18 मार्चला राज्याचं बजेट मांडलं जाणार आहे. त्याचवेळी राज्याच्या हलाखीच्या आर्थिक स्थितीवर श्वेतपत्रिका सादर करून राज्य सरकार आधीच्या आघाडी सरकार दोषारोप करणार आहे. त्यानिमित्तानं या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येणार आहेत. त्याशिवाय भाजप आणि शिवसेनेतील सध्याचे संबंध लक्षात घेता शिवसेनाही भाजपला अडचणीत आणण्याची संधी या निमित्ताने सोडणार नाही. त्यामुळे राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरण्याची शक्याता आहे. शेतकर्यांच्या मदतीवरून सरकारला अडचणीत आणण्याची विरोधकांना चांगलीच संधी मिळाली आहे. त्यात कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्ताधारी भाजपला पेचात पकडण्याचा प्रयत्न करतील. गृहखाते हे मुख्यमंत्र्यांकडेच असल्याने त्यांना लक्ष्य करण्याची संधी विरोधकांकडे आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर सत्ताधार्यांची कसोटी लागणार आहे. एवढंच नाहीतर मुंबई विकास आराखड्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. नगरविकास खाते मुख्यमंत्र्यांकडे असल्याने शिवसेना या मुद्दय़ावरही मुख्यमंत्र्यांची कोंडी करण्याची शक्यता आहे. दरम्यान, या अधिवेशनाची रणनीती ठरवण्यासाठी काँग्रेसच्या बैठीकाला सुरुवात झाली आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांसोबत मुंबईचे आमदार उपस्थित आहेत. राधाकृष्ण विखे-पाटील, माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत ही चर्चा होत आहे. मुंबई वगळता उर्वरित आमदारांची उद्या सकाळी बैठक होणार आहे.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++