JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आज बडोद्यातून भरणार अर्ज

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आज बडोद्यातून भरणार अर्ज

09 एप्रिल : भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आज बडोदा लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. सकाळी 11 वाजेपर्यंत ते आपला उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी मोदी बडोद्यात एक रोड शो घेणार आहेत. मोदींच्या उमेदवारी अर्जाला अनुमोदक म्हणून बडोद्यातले एक चहावाला आणि शहरातल्या एका राजघराण्यातला एक सदस्य त्यांच्यासोबत असतील. बडोद्यामध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. काँग्रेसतर्फे मधुसुदन मिस्त्री आणि आम आदमी पार्टीतर्फे सुनिल कुलकर्णी यांनी मोदींना आव्हान दिलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

8879_Narendra_Modi 09 एप्रिल :  भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आज बडोदा लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. सकाळी 11 वाजेपर्यंत ते आपला उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी मोदी बडोद्यात एक रोड शो घेणार आहेत. मोदींच्या उमेदवारी अर्जाला अनुमोदक म्हणून बडोद्यातले एक चहावाला आणि शहरातल्या एका राजघराण्यातला एक सदस्य त्यांच्यासोबत असतील. बडोद्यामध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. काँग्रेसतर्फे मधुसुदन मिस्त्री आणि आम आदमी पार्टीतर्फे सुनिल कुलकर्णी यांनी मोदींना आव्हान दिलं आहे. दरम्यान, नरेंद्र मोदी आज उमेदवारी अर्ज भरत असल्यानं भाजप कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली आहे त्याचं बरोबर शहरामध्ये ठिकठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. या निमित्ताने भाजप आणि मोदी समर्थक मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन घडवून आणतील अशी अपेक्षा आहे. मोदींबरोबर मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्तेही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाऊ शकतात. इतकंच नाही तर नरेंद्र मोदी बडोद्यातून 6 लाखांहून जास्त मताधिक्य मिळवतील अशी आशाही त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या