03 सप्टेंबर : मुंबईत छायाचित्रकार तरूणीवर बलात्कार प्रकरणातील अटकेत असलेल्या पाचही आरोपींनी आणखी एका तरूणीवर शक्ती मिलमध्ये बलात्कार केल्याचं उघड झालंय. या आरोपींविरोधात आणखी एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका तरूणीनं या आरोपींविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. या पाच आरोपींनी या तरूणीवर 31 जुलै रोजी बलात्कार केला होता असा आरोप पीडित मुलीनं केला आहे. याच पाच आरोपींपैकी चार आरोपींना या तरूणीनं ओळखलं आहे. ही मुलगा कुर्ला परिसरात राहते. 31 जुलैला शक्ती मिल परिसरातून जात असताना या मुलीवर बलात्कार करण्यात आला. यावेळेस तिचा एक मित्रही तिच्यासोबत होता.या मुलीनं भांडूप पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. ही तक्रार आता ना.म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात हस्तातंरित करण्यात आली आहे.