2 जून : गेल्या 60 वर्षांपासून पाहिलेलं स्वप्न, देशातलं 29वं राज्य म्हणून स्वतंत्र तेलंगणा राज्य मध्यरात्री अस्तित्वात आलं आला आहे. सव्वाआठच्या सुमारास तेलंगणाचे पहिले मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव उर्फ केसीआर यांनी शपथ घेतली. त्यापूर्वी सकाळी साडेसहा वाजताच संयुक्त आंध्र प्रदेशचे राज्यपाल ESL नरसिम्हन यांनी तेलंगणाच्या राज्यपालपदाची शपथ घेतली. याचबरोबर तेलंगणा राज्यात राष्ट्रपती राजवट हटवण्याची घोषणाही केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे करण्यात आली.
स्वतंत्र तेलंगणाचा हैदराबादसह तेलंगाणातल्या लाखो नागरिकांनी जल्लोषात स्वागत केलं. हैदराबादच्या चारमिनारसह ऐतिहासिक इमारती, सचिवालय असलेल्या नेकलेस रोडवर दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती. रात्री 12 वाजता तेलंगणा राज्याचा जन्म होताच ठिकठिकाणी ध्वजारोहण करून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. तेलंगणासाठी बलिदान करणार्या शहिदांच्या स्मृतीप्रित्यर्थ शहीद स्मारकावर नागरिकांनी श्रद्धांजली अर्पण केली.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून तेलंगणावासियांचं अभिनंदन केलं आहे. ते म्हणाले…
“भारताला नवीन राज्य मिळालं! आम्ही 29वं राज्य म्हणून तेलंगणाचं स्वागत करतो. येत्या काही वर्षांमध्ये तेलंगणा देशाच्या विकासामध्ये भर घालेल. या लढ्यातील शहीदांना वंदन करतो. तेलंगणाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार्या के. चंद्रशेखर राव यांचं अभिनंदन. माझ्या तेलंगणावासियांना हार्दिक शुभेच्छा."
कोण आहेत के . चंद्रशेखर राव?
स्वतंत्र तेलंगणा राज्याचा संघर्ष जवळपास 55 वर्षांचा आहे. एक नजर टाकूया तेलंगणाच्या इतिहासावर
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++