17 एप्रिल : ‘सबसे बडा खिलाडी, सुरेश कलमाडी’ काही दिवसांपूर्वी अशा घोषणांनी पुण्याच्या राजकारणात चांगलीच धुराळ उडाली होती. मात्र काँग्रेसने हात दाखवल्यामुळे ‘खिलाडी’ला निवडणुकीतून बाहेर पडावं लागलं. अशोक चव्हाण नशीबवान आहेत, मी नाही अशी खंत आता कॉमनवेल्थ घोटाळ्यातील आरोपी सुरेश कलमाडी यांनी बोलून दाखवलीय.
आज (गुरुवारी) पुण्यात सुरेश कलमाडींनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी कलमाडींनी प्रसारमाध्यमांकडे आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण नशीबवान आहेत, मी नाही असं दुखं कलमाडींनी व्यक्त केलं. विशेष म्हणजे कलमाडींना लोकसभेसाठी तिकीट देण्यात येणार अशी शक्यता होती पण काँग्रेसने आरोपग्रस्त कलमाडींना तिकीट देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यांच्या जागी विश्वजीत कदम यांना उमेदवारी देण्यात आली.
त्यामुळे नाराज कलमाडींनी बंड पुकारण्याची तयारीही केली होती. मला नाही तर माझ्या पत्नीला तरी तिकीट द्या अशी अखेरची मागणी कलमाडींनी केली होती. पण काँग्रेसच्या नेत्यांनी मध्यस्थी केल्यानंतर कलमाडींना तलवारम्यान करावे लागले होते. तर दुसरी काँग्रेसने अखेरच्या क्षणी आदर्श घोटाळ्यातील आरोपी अशोक चव्हाण यांना नांदेडमधून उमेदवारी जाहीर केली. आज कलमाडींनी मतदान केलं आणि आपल्या नशिबाला दोष तर चव्हाणांना नशिबावान म्हटलं.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++