JOIN US
मराठी बातम्या / देश / आज कुछ तुफानी करते है! तरुणाने पेट्रोल पंपावर फेकला पेटलेला फटाका, काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

आज कुछ तुफानी करते है! तरुणाने पेट्रोल पंपावर फेकला पेटलेला फटाका, काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

एका तरुणाने मात्र पेटलेला फटाका पेट्रोल पंपावर टाकल्याची (young man threw Firecrackers at petrol pump) धक्कादायक घटना समोर आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सूरत, 03 नोव्हेंबर: कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे (Corona pandemic) गेल्यावर्षी ऐन दिवाळी सणाच्या (Diwali festival) काळात नागरिकांवर अनेक प्रकारचे निर्बंध लादण्यात आले होते. पण सध्या देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात आला आहे. त्यामुळे अनेक राज्यामध्ये निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. परिणामी नागरिक मोठ्या उत्साहाने दिवाळी सण साजरा करत आहेत. दरम्यान, फटाके (Firecrackers) उडवताना काही दुर्घटना (Accidents) घडल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. असं असताना एका तरुणाने मात्र पेटलेला फटाका पेट्रोल पंपावर टाकल्याची (young man threw Firecrackers at petrol pump) धक्कादायक घटना समोर आली आहे. स्कूटरमध्ये पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर आलेल्या दोन तरुणांनी ही जीवघेणी मस्करी केली आहे. हेही वाचा- फटाके फोडताना सावधान ! पेटता फटाका डोळ्याला लागला, हिंगोलीत फटाक्यामुळे 9 वर्षीय मुलाने गमावला डोळा पेट्रोल भरल्यानंतर, गाडीवर पाठीमागे बसलेल्या एका तरुणाने फटाका पेटवून पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याच्या पायात फेकला आहे. संबंधित कर्मचाऱ्याने प्रसंगावधान दाखवत तातडीने तो फटाका पायाने दूर फेकला आहे. हा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV footage) कैद झाला आहे. याप्रकरणी पेट्रोल पंप मालकाने पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल (FIR lodged) केली आहे.

संबंधित बातम्या

पोलिसांनी संबंधित दोन्ही आरोपींविरोधात विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे आरोपी तरुणांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. तरुणांची क्षणभराची मस्करी भयावह ठरली असती. पण पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आहे. पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे. संबंधित घटना गुजरातमधील सुरत येथील एका पेट्रोल पंपावर घडली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या