पाटणा, 09 ऑगस्ट : महिलांची भांडणं (Women fighting) तशी काही नवीन नाहीत. अगदी गल्लीत नळाच्या पाण्यापासून ते रेल्वेत जागेसाठी भांडणाऱ्या महिलांचे व्हिडीओ (Women fighting video) आपण पाहिले आहेत. आता याच महिला कोरोना लसीकरण केंद्रावरही (Corona vaccination center) भिडल्या आहेत. कोरोना लशीसाठी महिलांनी अक्षरश: एकमेकींच्या झिंझ्या उपटल्या आहेत (Women fight for corona vaccine). कोरोना लशीसाठी महिलांमध्ये तुफान हाणामारी झाली. बिहारमधील (Bihar) महिलांच्या जबर फायटिंगचा व्हिडीओ समोर आला आहे.
छाप्रा जिल्ह्यातील ही घटना आहे. एकमा हॉस्पिटलमध्ये महिला लस घेण्यासाठी गेल्या होत्या. लशीसाठी महिलांची रांग लागली होती. या रांगेवरूनच महिलांमध्ये वाद सुरू झाला. चार महिला आपसात भिडल्या. वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. त्यानंतर पाहतात पाहता कोरोना लसीकरण केंद्राचं आखाड्यात रूपांतर झालं. महिलांनी एकमेकांचे केस धरले. एकमेकींना जमिनीवर आपटलं. त्यांच्यामध्ये जबर फाईट रंगली. हे वाचा - VIDEO : आणखी एका महिलेचा प्रताप; कार चालकाला 9 वेळा चापट मारत बॅटनं धुतलं महिला अक्षरश: एकमेकींच्या जीववरच उठल्या. काही लोकांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. पण महिला पुरुषांनीही आवरत नव्हत्या.